Viral Video: सध्याच्या काळात प्रत्येक तरुणाईमध्ये प्री-वेडिंग शूटचा क्रे्झ आपल्याला पाहायल मिळत आहे. आजकाल बहुतेक कपल लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूट करतात. यासाठी मस्त समुद्रकिनारे निवडतात तर काही किल्ल्याचे ठिकाण निवडतात. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत चक्क एका तरुणीने तिच्या प्री-वेडिंग शूटसाठी जिमची निवड केली आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसते की, तरुणी चक्क वधूच्या वेशभूषेत तयार झाली आहे. तिने प्री-वेडिंग शूटसाठी भगव्या रंगाची साडी परिधाण केलेली आहे. यात जीममध्ये तरुणी डंबेल उचलून व्यायाम करताना दिसत आहे. तरुणी व्यायाम करत असताना एक छायाचित्रकार तिचे फोटो काढत आहे. जिममध्ये प्री-वेडिंग शूटचे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. असे प्री-वेडिंग शूट याआधी क्वचितच कोणी केले असेल.
व्हायरल व्हिडीओ @HasnaZaruriHai या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. जिममधील व्यक्तीने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ मात्र नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. तसंच हा व्हिडीओला हजारोच्या घरात व्हूज मिळालेत आणि मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.