एरंडोल :- येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महसूल कर्मचा-यांनी वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई करून उत्राण अहिरहद्द येथील
ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक ०४ मध्ये अज्ञात व्यक्तीने साठा करून ठेवलेली १२० ब्रास वाळू जप्त केली.तसेच म्हसावद व नागदुली परिसरात नदीच्या पात्रातून वाळू काढण्यासाठी वापरण्यात आलेले लाकडी तराफे व
प्लास्टिकचे ड्रम नष्ट केले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी यु.बी.निंबाळकर,विनायक मानकुमरे,मनोज शिंपी,दीपक ठोंबरे,संजय साळुखे तसेच तलाठी सुरेश कटारे,सलमान तडवी,शकील शेख,रोहित इंगळे,नितीन पाटील,बालाजी लोंढे,श्रीकांत कासुंदे,सुधीर मोरे, कोतवाल अमोल पाटील,प्रदीप पाटील,ज्ञानेश्वर पाटील,उत्राणचे पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांनी
रविवारी उत्राण अहिर हद्द येथे गस्त घालून अज्ञात व्यक्तीने जमा केलेला १२० ब्रास वाळूसाठा पंचनामा करून जप्त केला.तसेच दोन डंपर,एक ट्रॅक्टर आणि
एक जेसीबी या वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच महसूल पथकाने सोमवारी उत्राण येथील वीस वाहनांची दहा कलमी कार्यक्रमाअंतर्गत माहिती घेवून सदर वाहनांचे मालक व चालक यांच्या कामकाजाची माहिती घेवून त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.तसेच त्यांच्या मोबाईलच्या कॉल डिटेलची देखील पडताळणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सांगितले.नागदुली व म्हसावद परिसरात वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू माफियांकडून लाकडी तराफे व प्लास्टिक ड्रमचा वापर केला जात होता.तहसीलदार सुचिता चव्हाण आणि त्यांच्या सहका-यांनी गिरणानदी काठालगत पाहणी केली असता त्यांना दोन तराफे आढळून आल्यामुळे ते नष्ट करण्यात आले.
महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.सद्यस्थितीत वाळूमाफियांनी महसूल पथकाच्या वाहनांबाबत सहका-यांना सुचना देण्यासाठी विशिष्ठ शब्दांचा वापर सुरु केला असून पथकाचे वाहन रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यासाठी निघाल्यास त्याची सुचना मोबाईलवरून विशिष्ट शब्दात दिली जात आहे.वाळू माफियांकडून चहा साठी थांबलो आहे,चहा पिऊन निघालो आहे,तुम्ही चहा पितांना काळजी घ्या असे सांकेतिक शब्दांचा वापर मोबाईलच्या माध्यमातून केला जात आहे.दरम्यान वाळूची चोरट्या
मार्गाने वाहतूक करणारे वाळू व्यावसायिक ग्राहकांना जास्त दराने वाळूची विक्री करीत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
हे पण वाचा
- VIDEO: लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने तिच्या प्रियकराला बेदम चोप देऊन धो धो धुतलं १३ ठिकाणी केलं फॅक्चर, दोघांचे होते अनैतिक प्रेम.
- खळबळजनक: मुलांना चांगले मार्क देऊ,पहिला नंबर आणू असे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांच्या आईवर ‘लैंगिक अत्याचार’
- पत्नीला सोशल मीडियावर रील्सचा नाद, इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग झाला अनावर दोघांत झाला वाद,पत्नीने असे केले की विचारही करू शकत नाही.
- लग्नात नवरदेवाच्या बूट लपविला मेहुणीने,५० हजार रुपयाची केली मागणी, पुढे जे घडलं त्यासाठी थेट पोलिसांना यावं लागलं.
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.