त्र्यंबकेशवर :- लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या एका पोलीस शिपायाने त्र्यंबकेशवरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मानेला हिसका देत, दीड तोळे वजनाची सोनसाखळी हसकावून पळ काढला होता.याबाबत सरकारवाडा व गुन्हे शाखेची पथके संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मागावर होती. त्याच्या साथीदाराने त्याची माहिती पोलिसांना दिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. योगेश शंकर लोंढे असे अटक केलेल्या संशयित पोलीस शिपायाचे नाव आहे.
तहसीलदार श्वेता संचेती या जेजुरकर कॉलनीच्या जवळील रस्त्याने किराणा माल खरेदी करुन पायी जात होत्या. त्यांच्यावर पाळत ठेवून दुचाकी घेऊन उभे असलेल्या दोघांपैकी एकाने संचेती यांची सोनसाखळी ओढली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. सोनसाखळी चोराने पुढे पळत जाऊन दुचाकीवर बसून धूम ठोकली होती. एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने लोंढे याने सोनसाखळी चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी श्वेता संचेती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संशियत आरोपीचा शोध घेत असताना लोंढे हा अंबड भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अंबड भागात सापळा रचून लोंढे याला शिताफीने ताब्यात घेतले. तत्पूर्वी लोंढे व त्याच्या अल्पवयीन साथीदारामध्ये वाद झाले होते. हा वाद चांगलाच वाढला आणि अल्पवयीन साथीदाराने घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती सरकारवाडा पोलिसांना कळवली. यामुळे पोलीस लोंढेच्या मागावर होते. चौकशीमध्ये तो पोलीस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले.
संशयित लोंढे याला 2012 मध्ये 15 हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोंढे यांची खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते.
निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो जनरल ड्युटी करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.