खळबळजनक! १६ व्यावर्षी लावून दिलं लग्न, मग केला अत्याचार, अन् पीडित अल्पवयीन मुलीने दिला मुलास जन्म…..

Spread the love

पती,वडील, सासरे आणि दीर यांच्यावर चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

चाळीसगाव :- पुणे जिल्ह्यातील खामगाव येथील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे एका वर्षापुर्वी लग्न चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील मुलाशी लावून दिले आहे. ऐवढेच नाही तर पिडीत मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म देखील दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत पतीसह सासरे, व पिडीत मुलीच्या वडीलांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, १७ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक वर्षापुर्वी पिडीत मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिच्या वडिलांनी तिचे लग्न चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरूणाशी लावून दिले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असतांना देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पिडीत अल्पवयीन मुलगी हिने बाळाला जन्म देखील दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या अनुषंगाने चाळीसगाव पोलीस ठाण्यात पती, वडील, सासरे आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार