29 वर्षांचा नवरदेव अन् 67 वर्षांची नवरी यांच्या लग्नात सामील झाले मुलगा,मुलगी, सून अन् नातवंडं काय आहे प्रकरण तर वाचा.

Spread the love

लग्नाची ही अजब कहाणी ऐकून डोकं चक्रावेल

लखनऊ : अशा अनेक घटना आहेत, ज्या वाचून किंवा जाणून कोणीही चकित होईल. अशीच एक कहाणी या वराची आहे, जो 29 वर्षांचा आहे आणि तो आपल्या 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार आहे. खरं तर हा पुनर्व‍िवाह आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं का? जर तो वयाच्या 29 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार असेल तर त्याचं पहिलं लग्न कोणत्या वयात झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या लग्नात एक आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे या जोडप्याचा मुलगा, मुलगी, सून यांच्याशिवाय नातवंडंही या लग्नात सामील होणार आहेत.

ही कहाणी अतिशय अजब आणि रंजक आहे.असा विवाह ज्यामध्ये मुलं त्यांच्या पालकांच्या लग्नाला उपस्थित राहतील आणि हा विवाह नसून पुनर्विवाह आहे. हा पुनर्विवाह उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये होत असून तुम्ही याआधीही अनेक लोकांकडून नवरदेव लाल बिहारीची गोष्ट ऐकली असेल. लालबिहारी अनेक वर्षे कागदावर मृत होते, मात्र आता ते कागदावर जिवंत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी कागदपत्रांमध्ये 30 जुलै 1976 ते 30 जून 1994 या कालावधीत त्यांना मृत दाखवण्यात आलं. प्रशासनाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर कागदपत्रांमध्ये ते पुन्हा जिवंत झाले.

लालबिहारींना पुन्हा जिवंत करण्यात आलं पण त्यांच्या मृत्यूची फाईल गायब करण्यात आली. लालबिहारींनी कागदपत्रांमध्ये स्वतःला जिवंत करण्यासाठी 47 वर्षे लढा दिला आणि त्यांचं वय 69 वर्षे आहे. पण सरकारी कागदपत्रांमध्ये जिवंत झाल्यापासूनच लाल बिहारी स्वतःला जिवंत समजत आहेत, म्हणून त्यांनी त्यांचं वय 29 वर्षे असल्याचं जाहीर केलं आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, लाल बिहारी वयाच्या 29 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न करत आहेत आणि ते त्यांच्या 67 वर्षांच्या पत्नीसोबत हे लग्न करत आहेत.लालबिहारी यांनी 1988 मध्ये अलाहाबाद जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत माजी पंतप्रधान व्हीपी सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. इतकंच नाही तर लालबिहारी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूकही लढवली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार