धुळे:- एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील नकाने रोड परिसरात एका 21 वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घरात घुसून अज्ञानाताने तरुणीची हत्या केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. तर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.निकिता कल्याण पाटील असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणीचे नाव असून राहत्या घरातच अज्ञाताने तिची गळा चिरून तिची हत्या केली आहे.
धुळे शहरातील बालाजी नगर भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे पाटील कुटुंबीय राहते. बुधवारी संध्याकाळी घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात आरोपीने थेट घरात घुसून तरुणीची गळा चिरून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.निकिताचे वडील खाजगी वाहनावर चालक असून घराची परिस्थिती बेताचीच असल्याने तिची आईदेखील घरकाम करते. संध्याकाळी देखील निकीताची आई घरकामानिमित्ताने बाहेर गेली होती. यावेळी निकिता घरात एकटी असल्याची संधी साधत अज्ञाताने घरात शिरून तिचा गळा चिरत तिची हत्या केली आहे.
घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळावर पंचनामा करत हत्या करण्यासाठी वापरलेल्या चाकूसह इतर पुरावे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने जप्त केले. दरम्यान, निकिताच्या मारेकरीला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथक तयार केली असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. दरम्यान निकिताची हत्या कोणी व का केली हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे निकीता कल्याण पाटील या 21 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती.
घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रथमदर्शनी तीक्ष्ण चाकूने गळा कापण्यात आला आहे. तसेच पोटात देखील खोलवर वार करण्यात आलं आहे. तीक्ष्ण हत्यारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तरुणीचा मृत्यू झाला आहे. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून काही संशयितांची नावे आमच्याकडे असून त्यानुसार तपास सुरु आहे. आरोपी हा मयत तरुणीच्या जवळच्या संबंधातील असावा असे घटनास्थळावरुन वाटत आहे,” अशी माहिती विभागीय पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी दिली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.