CCTV Video : रात्रीची वेळ… सर्वत्र शांतता… आलिशान पॉश कारमधून त्या दोघी आल्या अन् पुढे काय केलं पहा CCTV व्हिडिओ.

Spread the love

CCTV Video : नवी दिल्ली :- -सोशल मीडियात सध्या दोन महिला चोरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका पॉश कारमधून त्या फिरतात आणि चोरी करतात. चोरी कसली? तर झाडाच्या कुंड्यांची. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून १९ नोव्हेंबर रोजीची घटना असल्याचं बोललं जात आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

मोहालीच्या सेक्टर ७८ मध्ये एका बंगल्याच्या मुख्य गेटसमोर दोन कुंड्या होत्या. दोन महिला एका कारमधून येतात आणि गेटसमोरील कुंड्या कारमध्ये ठेवतात. गेल्या आठवड्यात याच परिसरात अशा १० घटना घडल्याचं सांगितलं जातं. अशाच प्रकारची एक घटना वर्षाच्या सुरुवातीला घडली होती. एक व्यक्ती आलिशान कारमधून आला आणि त्यानं जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या कुंड्या कारमधून नेल्या होत्या.

या कामात त्याच्या ड्रायव्हरनंही साथ दिली होती. त्याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. आता दोन महिलांनी केलेल्या कुंड्यांच्या चोरीच्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. @Gagan4344 नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे आणि त्याला आतापर्यंत ३.६२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पहा व्हिडिओ

हे पण वाचा

टीम झुंजार