अखेर बाभळे बु.ता. धरणगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने हटवले

Spread the love

धरणगाव न्यायालयात सुरू आहे खटला.!

धरणगाव :- बाभळे बु. येथील आठ ते दहा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गावठाण जागेवर अतिक्रमण करून शेड उभारलेले होते व त्याअनुषंगाने ग्रा.पं. प्रशासनाने इतर नागरिकांच्या तक्रारीवरून ग्रा.पं.कायद्यान्वये अतिक्रमण काढून टाकण्याची रीतसर नोटीस अतिक्रमण धारकांना दिलेली होती. सदर नोटीस व कारवाई विरुद्ध दोन अतिक्रमण धारकांनी धरणगाव न्यायालयात धाव घेत ग्रामपंचायत विरुद्ध दावा दाखल करून सदर जागेवर 50 वर्षापासूनचा ताबा असल्याचा दावा करत तात्काळ मनाई हुकूमाची मागणी केलेली होती.

सदर खटल्याच्या सुनावणीकामी ग्रा. पं. प्रशासनातर्फे ॲड.गजानन बी. पाटील यांनी सखोल व प्रभावी बाजू मांडत ग्रामपंचायत ने केलेली कारवाई हि कायदेशीर योग्य असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला व अतिक्रमण धारकांचा अर्ज न्यायाधीश श्री.ढोके यांनी दि .२३/१०/२०२३ रोजी फेटाळत त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

धरणगाव न्यायालयाच्या सदर आदेशाद्वारे तालुक्यातील अशा इतर सार्वजनिक जागेवर केलेल्या अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले असून ग्रामपंचायत प्रशासनास कायदेशीर बळ मिळाल्याचे स्पष्ट होते. बाभळे बू. ग्रामपंचायत तर्फे संपूर्ण प्रशासकीय बंदोबस्तात ग्रामसेवक व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत अतिक्रमण दि.२१/११/२०२३ रोजी हटवण्यात आले. ग्रामपंचायत तर्फे ॲड.गजानन बी. पाटील यांनी काम पाहिले.

हे पण वाचा

टीम झुंजार