नवी दिल्ली:- देशाची राजधानी दिल्लीतून पुन्हा एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत केवळ 350 रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाची 60 वेळा चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता मुलाच्या मृतदेहाशेजारी डान्स देखील केला. हा सगळा धक्कादायक प्रकार तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
दिल्लीत 16 वर्षांच्या मुलाने 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची एका गल्लीत चाकूने भोसकून हत्या केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या छातीवर आणि मानेवर एक-दोनदा नव्हे तर 60 वेळा वार केले. एवढेच नाही तर घटनेनंतर आरोपींनी मृतदेहाजवळ डान्सही केला. आरोपीने अल्पवयीन मुलाची मान कापण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यावर लाथाही मारल्या. आरोपींनी शेजारच्या लोकांनाही चाकूचा धाक दाखवून धमकावलं. या सगळ्या घटनेनंतर जखमी अल्पवयीन मुलाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा सगळा धक्कादायक प्रकार उत्तर पूर्व दिल्लीतील वेलकम पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी रात्री घडला.
पोलिसांनी बुधवारी सकाळी 16 वर्षीय आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने शाळा सोडली असून तो दिल्लीत त्याच्या पालकांसोबत राहतो. आरोपीचे आई-वडील मजुरी करतात. हत्येवेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. तर हत्या झालेला मुलगा हा जाफ्राबादजवळ आईसोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेला अल्पवयीन मुलगा आरोपीला ओळखत नव्हता. आरोपीने आधी पीडित मुलाकडे बिर्यानी खाण्यासाठी 350 रुपये मागितले होते.
पीडित मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने मुलाचा गळा दाबला आणि त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर आरोपीने रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी पीडित मुलाला तशाच अवस्थेत एका गल्लीत खेचत आणलं. तितक्यात आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मुलावर वार करण्यास सुरुवात केले. आरोपीने एकामागून एक असे तब्बल 60 वेळा वार केले. आरोपीने मान, गळा आणि कानावर सपासप वार केले. त्यानंतर तो काही वेळ थांबला आणि पुन्हा वार करू लागला.
यामध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला.वार केल्यानंतर आरोपीने त्याच्या चाकूकडे पाहिलं आणि मृत मुलाच्या डोक्यावर लाथा मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेजारी बसून त्याची मान कापण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपी उभा राहून नाचायला लागला. या घटनेनंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.
हे पण वाचा
- VIDEO: लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने तिच्या प्रियकराला बेदम चोप देऊन धो धो धुतलं १३ ठिकाणी केलं फॅक्चर, दोघांचे होते अनैतिक प्रेम.
- खळबळजनक: मुलांना चांगले मार्क देऊ,पहिला नंबर आणू असे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांच्या आईवर ‘लैंगिक अत्याचार’
- पत्नीला सोशल मीडियावर रील्सचा नाद, इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग झाला अनावर दोघांत झाला वाद,पत्नीने असे केले की विचारही करू शकत नाही.
- लग्नात नवरदेवाच्या बूट लपविला मेहुणीने,५० हजार रुपयाची केली मागणी, पुढे जे घडलं त्यासाठी थेट पोलिसांना यावं लागलं.
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.