पाळधी येथे जागतिक स्मरण दिना निमित्त सुमित पाटील यांना सन्मानपत्र देऊन सत्कार

Spread the love

पाळधी ता जळगाव :- दि. २४ रोजी म.पो केंद्र चाळीसगाव मा.डॉ.रवींद्र कुमार सिंगल ,सर (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक ( वाहतुक),मुंबई, यांचे संकल्पनेतून मा. डॉ.मोहन दहिकर सर,पोलीस अधिक्षक, महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, मा. श्री.प्रदीप मैराळे सर,पोलीस उपअधीक्षक, मा.श्री. हेमंतकुमार भामरे सर ,पोलीस निरीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीच्या स्मरणार्थ जागतिक स्मरण दिन व 19 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर हा “जागतिक स्मरण दिन” सप्ताह साजरा करणेच्या अनुषंगाने आज रोजी म पो केंद्र पाळधी येथे कार्यक्रम घेण्यात आला

या वेळी जळगाव जिल्ह्यात मेन हाय वरती होणाऱ्या अपघात यासाठी ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी जळगाव जिल्ह्यात जे रतन दिवस मदत करतात जळगाव जिल्हा तुन फक्त ५ हायवे मृत्युंजय यांना निवड करण्यात आली यावेळी पहिला नंबर वावडदे ता जि जळगाव येथील मराठा सामाजिक कार्यकर्ते मराठा समाज भूषण प्राप्त बापूसाहेब सुमित पाटील सर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी
05 अपघात ग्रस्त पीडितांचे नातेवाईक व 20 मृत्यंजय दुत तसेच स्थानिक नागरीक असे एकूण 65 लोक हजर होते. सर्व प्रथम अपघातामधील मयत व्यक्तिच्या स्मरणार्थ २ मिनिटे सर्वांनी उभे राहून मौन पाळून आदरांजली वाहिली.

त्यानंतर वाहतूक नियामबाबतचे नियमित पालन कारणेबाबत सर्वांनी शपथ घेतली
अपघातग्रस्तांच्या 03 नातेवाईकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले व नियम न पाळण्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली.
ॲड.श्री देवेंद्रसिंग जाधव,जळगाव
इन्शुरन्स अधिकारी तारे साहेब व जावेद साहेब यांच्याकडून अपघातग्रस्त पिडीतांना शासनाकडून तसेच विमा कंपन्यांकडून मिळणारे अनुदान व त्याकरिताच्या अटी व शर्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच शासकीय योजना,त्याबाबतीत
लागणारा कालावधी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच RTO अधिकारी गणेश पाटील, राहुल काळे. मनिष देवरे यांनी

वाहन चालकांना खालील वाहतूक नियमांचे नेहमी पालन करावे बाबत सांगितले.
1.भरधाव वेगाने वाहन चालवू नये,
2.मोटासाईकल चालवताना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
3.चार चाकी वाहन चालवताना नेहमी सिटबेल्ट चा वापर करावा.
4.मद्यपान करून वाहन चालवू नये.

इत्यादी वाहतूक नियम सांगून
म पो केंद्र,पाळधी हद्दीत गर्दीच्या ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले आहे या वे महामार्ग चे पोलिस अधिकारी राहुल शेजवळ व भागवत पाटील तसेच पोलीस अंमलदार .गुलाब मनोरे.सुनिल पाटील.अशोक पाटील.दिपक पाटील.अनिल सपकाळे हितेश पाटील या सह सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते…

हे पण वाचा

टीम झुंजार