कोईम्बतूर : तामिळनाडूतील कोईम्बतूर या शहरातील एका कॉलेजमधून संतापजनक घटना समोर आली आहे. कॉलेजमध्ये ब्रँडमिंटन प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या नराधमाने ११वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या तरुणीकडे नग्न फोटोंची मागणी केली. तसंच तरुणीने नकार दिल्यानंतर कपडे बदलताना गुपचूप तिचे फोटो काढले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डी. अरुण (वय २८) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर येथील एका खासगी कॉलेजमध्ये डी. अरुण हा मागील सहा महिन्यांपासून हंगामी बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून काम पाहात होता. अरुणने ११वीत शिकणाऱ्या एका तरुणीला व्हॉट्सअॅपवर तिचे फोटो पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर तरुणीने स्वत:चे फोटो त्याला पाठवले. मात्र नंतर तो सदर तरुणीला तिचे नग्न फोटो पाठवण्याची मागणी करू लागला. बॅडमिंटन प्रशिक्षकाच्या या कृत्याने घाबरलेल्या तरुणीने असे फोटो पाठवण्यास नकार दिला.तरुणीने फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अरुण याने सदर तरुणीचे कॉलेज परिसरात कपडे बदल असताना फोटो काढले.
हा प्रकार पीडितेच्या लक्षात येताच तिने याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली आणि बुधवारी सायंकाळी पोलीस स्टेशन गाठले. पीडित तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पोलीस कारवाईनंतर कॉलेज प्रशासनानेही डी. अरुण याची बॅडमिंटन प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे.दरम्यान, सदर आरोपीची विकृती दाखवणाऱ्या इतर घटनाही आता समोर येऊ लागल्या आहेत. आरोपी अरुण याने कॉलेजमधील इतरही पाच मुलींशी गैरवर्तन करत त्यांच्याकडे नग्न फोटोंची मागणी केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.