आजचे राशी भविष्य वार २६ नोहेंबर २०२३

Spread the love

येणारा दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:

आजचा दिवस चांगला आहे. ग्रहमान चांगले असल्याने वास्तु खरेदीचा योग आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होतील. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धन लाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल.

वृषभ:

आज दिनमान प्रतिकूल आहे. चंद्रबल अनिष्ट आहे. कामकाज किंवा रोजगारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळा. प्रवास टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार टाळा. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष दया. मानसिक स्वास्थ संभाळा.

मिथुन:

आज चांगले दिनमान आहे. चंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुनी देणी मिळतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मंगल कार्याचे नियोजन कराल. आर्थिक वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. दिवस शुभ फलदायी ठरेल.

कर्क:

आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत वेगळ्या कल्पना मंडल्यास त्यात यश मिळेल. वरिष्ठ कौतुक करतील. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल.

सिंह:

आज दिनमान प्रतिकूल आहे. कामाच्या ठिकाणी वाद होतील. प्रवास टाळा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा. नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात.

कन्या:

आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी जरा जपून काम करावे लागणार आहे. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च विचार करून करावा लागणार आहे. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. .

तूळ:

आजचा दिवस चांगला आहे. शुक्र-चंद्र प्रतियोगात शुभफळे मिळतील. नोकरी व्यवसायासाठी चांगले वातावरण राहील. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल.व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.

वृश्चिक:

आजचा दिवस अनुकूल आहे. नशीबाची साथ लाभेल. नोकरीत मनाजोगे प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी चांगला दिवस आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. लांबचे प्रवास घडतील. परदेशात जाण्याचा योग आहे. प्रेमप्रकरणाचा मार्ग सुरखकर होईल.

धनु:

आज प्रतिकूल दिनमान आहे. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण राहील. व्यापारात पार्टनर सोबत वादविवाद होतील. मोठे व्यवहार टाळा. आर्थिक हानी तथा फसवणुक होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील.

मकर:

आजचा दिवस चांगला आहे. शनिबल चांगले आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. जुनी देणी मिळतील. कोर्टाची कामे सुरुळीत पार पडतील.

कुंभ:

श्रीगणेश सांगतात की, आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून स्वजना बरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तिंची साथ व दांपत्यजीवन यात धनिष्ठता अनुभवाल. आर्थिक लाभ आणि सामाजिक मान प्रतिष्ठा मिळेल.

मीन:

आज रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह होतील. व्यवहारात अपेक्षित यश लाभेल.

हे पण वाचा

टीम झुंजार