सेक्स करत असताना उद्भवलेल्या वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीनं देहविक्रय करणाऱ्या महिलेची हत्या केली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात मंगळवारी रात्री घडली.पप्पू (४० रा. मुंबई) असं आरोपीचं नाव असून हत्या करून तो फरार झाला आहे.
ठाणे : शरीराची भूक भागवण्यासाठी एक ४० वर्षीय व्यक्ती मुंबईहून भिवंडीतील रेड लाईट परिसरातील हनुमान टेकडी येथील देहव्यापार करणाऱ्या ३५ वर्षीय सेक्स वर्करच्या घरी आला होता; मात्र दोघेही सेक्स करताना वाद झाल्यानं, सेक्स वर्करची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्यावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाद विकोपाला गेलानं केली हत्या :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा सेक्स वर्करचा व्यवसाय भिवंडी शहरातील हनुमान टेकडी भागात आहे. या ठिकाणी मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपी पप्पू हा मुंबईहून शारीरिक सुख उपभोगण्यासाठी भिवंडीत आला होता. दरम्यान आरोपी आणि मृतक सेक्स करत असतानाच, दारूच्या नशेत आरोपीने वाद घातला. त्यानंतर वादाचं रुपांतर भांडणात झाल्यानं वाद विकोपाला गेला. यानंतर पप्पूनं सेक्स वर्कर महिलेची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरता येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. या हत्येप्रकरणी रिझवाना हिच्या फिर्यादीवरून आरोपी पप्पू विरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पसार, मित्रालाच पकडलं :
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता, मंगळवारी रात्रीच्या सुमारास आरोपी हा एका मित्रासह हनुमान टेकडी भागात एका सेक्स वर्करच्या घरात सेक्स करण्यासाठी आला होता; मात्र दोघांमध्ये काही कारणावरून वाद होऊन आरोपी त्या महिलेची हत्या करून फरार झाला. त्याच्या शोधात दोन पोलीस पथकासह भिवंडी गुन्हे शाखेचं एक पथक समांतर तपास करीत आहे. आरोपी सोबत आलेल्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……