एरंडोल :- नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव दाभाडी येथील अल्पवयीन अदिवासी मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच माजीमंत्री आमदार जयकुमार रावल,माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिल विकास मंचच्यावतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबाबत कारवाई न केल्यास मंचतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.भिल समाज विकास मंचच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,की नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव दाभाडी येथील अदिवासी समाजातील
अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला असून सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी.राज्यात अदिवासी समाजातील महिलांवर होणा-या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून शासनाने
याप्रकरणी गंभीर दखल गंभीर दखल घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अदिवासी समाजातील ४७ जातींना केवळ सात टक्के आरक्षण असून त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे.माजीमंत्री आमदार जयकुमार रावल,माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणाची माहिती असून देखील त्यांनी कोळी व धनगर समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी होऊन
मनोगत व्यक्त करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.याबाबत शासनाने
दखल न घेतल्यास भिल समाज विकास मंचच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे,सोशल मिडीया प्रमुख सागर वाघ, तालुकाध्यक्ष भैय्या अहिरे,युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,लक्ष्मण जावळे,खंडू बोरसे यांचेसह
पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
हे पण वाचा
- VIDEO: लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने तिच्या प्रियकराला बेदम चोप देऊन धो धो धुतलं १३ ठिकाणी केलं फॅक्चर, दोघांचे होते अनैतिक प्रेम.
- खळबळजनक: मुलांना चांगले मार्क देऊ,पहिला नंबर आणू असे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांच्या आईवर ‘लैंगिक अत्याचार’
- पत्नीला सोशल मीडियावर रील्सचा नाद, इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग झाला अनावर दोघांत झाला वाद,पत्नीने असे केले की विचारही करू शकत नाही.
- लग्नात नवरदेवाच्या बूट लपविला मेहुणीने,५० हजार रुपयाची केली मागणी, पुढे जे घडलं त्यासाठी थेट पोलिसांना यावं लागलं.
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.