एरंडोल :- मतदार संघात झालेल्या विकासकामांमुळे हतबल झालेल्या विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून,सर्व विरोधकांच्या
आरोपांकडे दुर्लक्ष करून त्यांना विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.विखरण-रिंगणगाव
गटातील एकवीस गावात सुमारे ५१ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ व पूर्ण झालेल्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
पहा व्हिडिओ भाग १
https://www.youtube.com/@zunjaarnews*Like share and Subscribe our youtube Channel* आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????
यावेळी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील आणि स्थानिक पदाधिका-यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात
आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी चार वर्षात मतदारसंघात पूर्ण झालेल्या तसेच मंजूर झालेल्या विकासकामांची माहिती दिली.सद्यस्थितीत
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विकासाची घौडदौड वेगाने सुरु असल्याचे सांगितले.मतदारसंघातील विकासकामांमुळे
विरोधक खोटे आरोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
विरोधकांनी केलेल्या आरोपांना मतदार संघातील विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सांगितले.विरोधकांनी केलेल्या खोट्या व दिशाभूल करणा-या आरोपांना मतदार बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.सर्वसामान्य मतदार,प्रामाणिक आणि निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद असल्याचे सांगितले.विरोधकांनी खोटे आरोप करण्यापेक्षा मतदार संघात सुरु असलेल्या विकासकामांबाबत बोलावे असे आव्हान दिले.
पहा व्हिडिओ भाग २
https://www.youtube.com/@zunjaarnews*Like share and Subscribe our youtube Channel* आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????
मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा
विश्वास व्यक्त केला.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांचेसह स्थानिक पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केले. विखरण-रोंगणगाव गटातील टाकरखेडे,वैजनाथ,कढोली, खेडी खुर्द,दापोरी,रवंजे खुर्द आणि बुद्रुक,श्रीक्षेत्र सुकेश्वर
देवस्थान,खर्ची खुर्द,रिंगणगाव,पिंपळकोठा खुर्द आणि बुद्रुक,सावदा प्र.चा,विखरण,उमरदे,वरखेडी,पिंपळकोठा प्र.चा,पिंप्री बुद्रुक,पिंप्री प्र.चा.,जवखेडे खुर्द आणि बुद्रुक, या गावात रस्ते,सामाजिक सभागृह यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आमदार चिमणराव पाटील आणि उपस्थित
पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार चिमणराव पाटील आणि पदाधिका-यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. गावातील महिलांनी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचे औक्षण केले. कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राखे,तालुका संघटक संभाजी पाटील,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),माजी सभापती गबाजी पाटील,युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, बाजार समितीचे संचालक किरण पाटील,रवंजेचे सरपंच देविदास चौधरी,
तळईचे उपसरपंच प्रभाकर पाटील,पन्नालाल सोनवणे,पारोळ्याचे युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील,शहरप्रमुख गौरव भोई,माजी सभापती बापू पाटील,अंतुर्ली खुर्दचे सरपंच गौरव पाटील,समाधान मगर,आडगावचे सरपंच महेश मोरे, ,मुंदाणेचे सरपंच एकनाथ पाटील,साहेबराव पाटील,टोळीचे सरपंच बाळासाहेब पाटील,जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ.सतीश देवकर,सुरेश पाटील, नितीन बारी,गोविंद पवार,सावन शिंपी,शहर संघटक मयूर महाजन,प्रवराज पाटील,गोविंदा बिर्ला,बंटी पाटील, रिंगणगावचे सरपंच कडू महाजन,रतन पाटील, शरद ठाकूर,मुकुंदा पाटील,नाना कोळी यांचेसह सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.