वसई : नालासोपारा शहरात अल्पवयीन मुलीवंर लैंगिक अत्याचार करणार्या दोन विकृतांपैकी एका आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. त्यांची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिस जाहीर केले होते.विकृतांच्या या कृत्यामुळे पालक धास्तावले होते. नालासोपारा शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या विकृतांची दहशत पसरली होती. त्यापैकी ९ ऑक्टोबर आणि १५ नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या दोन्ही आरोपीची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिध्द करून त्यांची माहिती देणार्यास बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही विकृत आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांच्या पथकांसह गुन्हे शाखेची ३ पथके स्वतंत्रपणे तपास करत होती. यातील एक आरोपी उत्तर प्रदेश मध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.
विशाल कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे. तो नालोसापारा येथील राहणारा असून संगणाकाचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय करतो. १५ नोव्हेंबर रोजी नालासोपारा येथील ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळून गेला होता. आरोपी कनोजिया याला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करून सोमवारी वसईत आणले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.पोलिसांकडून दुसऱ्या विकृत आरोपीचा शोध सुरू आहे.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.