साक्री :- येथील दरोडा प्रकरणी अपहृत तरुणी सुखरूप हाती लागली असली तरी या प्रकरणामागचे गूढ कायम आहे. संपूर्ण देशात दरोडेखोरांनी तरुणींचे अपहरण करून नेण्याची अनाकलनीय घटना केवळ जिल्ह्यातील साक्रीत घडल्याने राज्याचे पोलिस महासंचालकही चक्रावले आहेत. या प्रकरणी मुळाशी तपास करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, दरोडाच्या घटनेतील अपहृत तरुणी सुखरूप असून, आतापर्यंतच्या तपासाअंती जबाजबाबातून घटनेबाबत संदिग्धता जाणवत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेनंतर सांगितले.
तपास सुरू असल्याने तूर्त अधिक बोलणे उचित नसल्याचे सांगत श्री. धिवरे यांनी सेंधवा (मध्य प्रदेश) येथून संबंधित तरुणीला जिल्ह्यातील नियुक्त पथकाने सुखरूप आणले, तिला कुठलीही क्षती पोचलेली नाही, असे सांगितले.साक्री येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वती नगरात शनिवारी (ता. २५) रात्री अकराच्या सुमारास दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी निशा मोठाभाऊ शेवाळे हिचे अपहरण केल्याने खळबळ उडाली. तिला सेंधवा (मध्य प्रदेश) येथून सुरक्षित, सुखरूप परत आणण्यास स्थानिक पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दरोडेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. लवकरच या आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात
सरस्वती नगरात ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या घरी पाच ते सहा जणांनी दरोडा टाकत सुमारे ८८ हजार पाचशे किमतीचा ऐवज तसेच त्यांच्या २३ वर्षीय भाचीचे अपहरण केले होते. पोलिस यंत्रणेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला गती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम, प्रसाद रौंदळ यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.
पहाटे पाचला तरुणी ताब्यात
अपहृत तरुणीचा शोध सुरू असताना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सेंधवा येथून विजय जाधव नावाच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाच्या मोबाईलवरून तरुणीने वडील मोठाभाऊ शेवाळे यांच्याशी संपर्क साधला. श्री. शेवाळे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यावर साक्री पोलिस आणि सांगवी (ता. शिरपूर) येथील पोलिस पथक सेंधवाच्या दिशेने रवाना झाले. तिला ताब्यात घेत पहाटे पाचच्या सुमारास साक्री येथे सुखरूप, सुरक्षित आणल्याची माहिती श्री. सोनवणे यांनी दिली.
दरोडा प्रकरणात संदिग्धता
दरोडा व अपहरण प्रकरणी अनेक प्रकारे संदिग्धता निर्माण होत असून, विविध शक्यतांचा विचार करून तपास केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच उलगडा व्हावा यादृष्टीने तपासाला गती दिली जात आहे. एकूणच या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने पालकांनी आपल्या पाल्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देत, त्यांच्या हालचाली, मोबाईलचा वापर, सोशल मीडियातील वावर याकडे लक्ष देण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे यांनी केले. तसेच या संवेदनशील प्रकरणात संयम दाखवत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले.
हे पण वाचा
- VIDEO: लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने तिच्या प्रियकराला बेदम चोप देऊन धो धो धुतलं १३ ठिकाणी केलं फॅक्चर, दोघांचे होते अनैतिक प्रेम.
- खळबळजनक: मुलांना चांगले मार्क देऊ,पहिला नंबर आणू असे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्यांच्या आईवर ‘लैंगिक अत्याचार’
- पत्नीला सोशल मीडियावर रील्सचा नाद, इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग झाला अनावर दोघांत झाला वाद,पत्नीने असे केले की विचारही करू शकत नाही.
- लग्नात नवरदेवाच्या बूट लपविला मेहुणीने,५० हजार रुपयाची केली मागणी, पुढे जे घडलं त्यासाठी थेट पोलिसांना यावं लागलं.
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.