Viral Video: सेल्फी घेण्यावरुन महिलांमध्ये सुरू झाला वाद, हाणामारीत एकमेकींचे केस ओढत लाथा-बुक्यांनी मारहाण पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. खरं तर, सोशल मीडियामुळे आपल्याला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. अनेकदा क्षुल्लक कारणावरुन झालेली भांडणे, तर कधी निष्काळजीपणामुळे झालेले अपघात व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. महिलांच्या या भांडणाला कारणीभूत ठरली आहे ‘सेल्फी’; कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता.मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या भांडणाचा हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. येथील गांधी पार्कमध्ये काही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तर ही हाणामारी सेल्फी घेण्याच्या कारणावरुन झाल्याचं सांगितलं जात आहे.

इथे मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या. यावेळी काही महिला सेल्फी घेत असतानाच तिथे उपस्थित महिलेशी त्यांचा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये दोन गटात हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. यावेळी तीन ते चार महिला एकीला वाईटरित्या मारताना दिसत आहेत. शिवाय समोरच्या गटातील महिला स्वत:च्या बचावासाठी लाथा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढतानाही दिसत आहेत.

महिलांची भांडण सुरु असताना तिथे शेकडो लोक उपस्थित असलयाचंही दिसत आहे.महिलांच्या या भांडनाचा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतअसून तो आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘लोक या भांडणाची मजा घेत आहेत.’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘गांधी’ पार्कमध्ये ‘हिंसा.’

हे पण वाचा

टीम झुंजार