येणारा दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
श्रीगणेश आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा देतील. तथापि विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या यात्रेचा योग येईल. भावंडांशी सलोखा राहील. त्याचा फायदा मिळेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:
मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल असे श्रीगणेश सांगतात. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना फार चांगला काळ आहे.
मिथुन:
आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्यजीवनात सुखा-समाधानाची भावना राहील. आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी अनुकूल दिवस. खर्च वाढेल. त्यावर काबू ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
कर्क:
परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बेत बिघडेल. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह:
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये होतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल.
कन्या:
श्रीगणेश कृपेने नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान- सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. तब्बेत चांगली राहील. गृहस्थी जीवनात सुख शांती आणि सुसंवाद राहील. वसुली किंवा व्यावसायिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल.
तूळ:
बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास किंवा तीर्थस्थानाला भेट द्याल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेश स्थित स्नेह्यांकडून वार्ता मिळतील. तब्बेत यथा तथाच राहील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील असे श्रीगणेश सांगतात.
वृश्चिक:
श्रीगणेश सांगतात की उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे- पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आध्यात्मिक साधनेसाठी दिवस चांगला आहे. चिंतन- मनन यात वेळ घालवाल. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील.
धनु:
श्रीगणेश म्हणतात की पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारी मध्ये लाभ होईल.
मकर:
आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. वसुली तसेच पैशांच्या देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात- निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. तब्बेत चांगली राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.
कुंभ:
मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात.
मीन:
आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची तब्बेत हा चिंतेचा विषय होईल. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी आणि मानहानी होईल. नोकरीत समस्या उद्भवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.