झाशी :- मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्या प्रेमासाठी घरदार आणि शहर सोडलं. ती तिच्या प्रियकरासोबत राहू लागली आणि नंतर तरुणीने त्याच्याशी लग्न केलं. मात्र त्याने आता तिची मोठी फसवणूक केली आहे. लग्नानंतर तरुणी गरोदर राहिली. याच दरम्यान तिचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. आता तरुणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.एरच पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची तिच्या प्रियकराने फसवणूक केली.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पुष्पेंद्र अहिरवार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांना लग्नाबाबत सांगितलं, पण त्यांना लग्न मान्य नव्हतं. यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी कानपूरच्या आर्य समाज मंदिरात लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते.लग्नानंतर दोघेही आनंदात राहत असल्याचे तिने सांगितलं. आधी बनारसमध्ये राहिलो आणि नंतर नोएडामध्ये राहू लागलो. यानंतर ते झाशीतील मौरानीपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. येथे दोघांमध्ये वाद सुरू झाले.
तरुणीने सांगितलं की, तिचा नवरा तिला त्रास देऊ लागला. तो रोज भांडू लागला, मारू लागला. सात महिन्यांपूर्वी वाद झाला होता. नवऱ्याने तिला टेरेसवरून खाली फेकलं होतं. यामुळे पाठीचा कणा तुटला होता. याच दरम्यान ती गरोदर राहिली, मात्र त्यांच्यातील वाद वाढतच गेला. पती दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आला. त्यानंतर संधी साधून तो दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. आता तरुणी एकटी राहिली आहे. पळून जाऊन लग्न केल्यामुळे आई-वडील रागावले आहेत. तर सासरचे लोकही तिला साथ देत नाहीत.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……