इंदूर :- (मध्य प्रदेश) मधील दुहेरी हत्याकांडाचा अखेर छडा लागला आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांची आणि सख्ख्या बहिणीची हत्या केल्याचे तपासात समोर आले. धक्कादायक म्हणजे दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी त्यांच्या मृतदेहांजवळ ४८ तास बसून राहिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोव्यातून त्याला अटक करण्यात आली. नवलखाच्या वसुधैव कुटुंबकम अपार्टमेंटमध्ये ८ नोव्हेंबरला किशोर धामन्दे आणि रमा अरोरा यांचे मृतदेह आढळले होते. .
दोघांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा पुलकित हा फरार होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.बँक ट्रान्झॅक्शनच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गोव्यातून अटक केली.
लग्न न करून दिल्यानं नाराजी
४६ वर्षीय आरोपी अविवाहित होता. लग्न करून न दिल्यानं तो वडिलांवर नाराज होता. काही दिवसांपूर्वी त्याला नशामुक्ती केंद्रातून घरी आणले होते. मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. हत्या केल्यानंतर तो ४८ तास दोघांच्या मृतदेहांजवळ बसून होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
औषधे घेण्यास सांगितली म्हणून होता राग
हत्येच्या दिवशी पुलकितला त्याच्या बहिणीने आणि वडिलांनी त्याची औषधे घेण्यास सांगितले. त्यावर तो अचानक चिडला आणि त्याने घरात असलेल्या मुसळीने दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली.
बँक ट्रान्झॅक्शनमुळं आरोपी अलगद अडकला
या दुहेरी हत्याकांडानतंर आरोपी फरार झाला होता. इंदूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीला पकडून देणाऱ्यांना १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काही दिवसांनी बँक ट्रान्झॅक्शनवरून आरोपीचा माग काढला. अखेर गोव्यातून त्याला अटक करण्यात आली.हत्येनंतर पश्चाताप नाहीपोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यानं दिलेली माहिती सुन्न करणारी आहे. बहीण माझ्याविषयी कायमच वडिलांना भडकवत असे. तसंच वडिलही मला प्रत्येक गोष्टीवरून अडवणूक करायचे, असं त्यानं सांगितलं. वडिलांची अन् बहिणाची हत्या केल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.