पारोळ्याजवळ भीषण अपघात! अंत्ययात्रेला जात असलेल्या पिक अपला कंटेनरची जोरदार धडककेत 3 ठार 22 गंभीर जखमी

Spread the love

पारोळा – येथे वीचखेडे गावा पुढें बाय पास रस्त्यावर एका कंटेनर ने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या पीक अप ला जोरदार धडक दिल्याने यात तीन महिलांचा जागीच मृत्यू होऊ न इतर 22 जण गंभीर जखमी झालेत. या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार बोळे तालुका पारोळा येथून चीलाणे तालुका शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कार साठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH -18-M-5554 मध्ये 22 महिला पुरुष घेऊन जात होते सकाळी 12 वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक GJ -12-BW -7254 चा ताबा सुटल्याने त्याने सदर पीक अप ला जोरदार

धडक दिल्याने यात रेखाबाई गणेश कोळी 55, योगिता रवींद्र पाटील, राहणार बोळे वय ४०, चंदनबाई नानाभाऊ गिरासे वय ६५ या तिघ महिला जागीच ठार झाल्या तर इतर २२ जण गंभीर जखमी झालेत ज्यात भरत गिरासे ,रणजित गिरासे ,राजेश कोळी ,भिमकोर गीरासे,भुरा बाई गीरासे ,चंदन बाई गीरासे ,रेखा बाई , गीरासे, नाना गीरासे , भटा गीरासे ,सुनीता गीरासे ,धुराबाई गीरासे ,रेखा बाई कोळी ,अजतसिंग गीरासे ,सय्यद लीहायत ,हिरा बाई गीरासे ,भिमकोरबाई गीरासे ,भगवान गिरसे ,रणजितसिंग गीरासे ,रुपासिंग गीरासे , दश्या बाई गिरासे , व राजे बाई कोळी असे एकूण २२ जण गंभीर जखमी झालेत

यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप ..सदर अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते .यावेळी माजी आ डॉ सतीश पाटील यांनी भेट देऊन जखमिंची विचारपूस केली.

हे पण वाचा

टीम झुंजार