येणारा दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आज सावधागीरी बाळगण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कारण आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाता ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. विद्यार्जनासाठी दिवस मध्यम फलदायी राहील. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस अनुकूल नाही. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही याकडे लक्ष द्या. स्त्रिया व पाणी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण तणावाचा राहील.
वृषभ:
श्रीगणेशाच्या मते आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. जास्त भावूक आणि हळवे बनाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्यरचना कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिगत होतील. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्या.
मिथुन:
मिश्रफलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल. मित्र आणि हितचिंतकांच्या गाठीभेटी होतील, व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी सहकार्य करतील. कुटुंबतील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल.
कर्क:
आज सर्वदृष्टीने आनंद देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास आणि खाण्यापिण्याचे चांगले बेत आखाल. प्रवास आनंददायी होईल. आनंदी वार्ता मिळतील. पत्नीकडून आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक सुख व समाधान मिळेल. मन जास्त संवेदनशील बनेल.
सिंह:
संवेदनशीलतेवर संयम ठेवा असा सल्ला आज श्रीगणेश देत आहेत. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नाहक वादविवाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून वार्ता येतील. वर्तनाम संयम सोडू नका. स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा. आज खर्च जास्त होईल.
कन्या:
आज लाभदायक दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धनप्राप्तीसाठी शुभ दिवस. मैत्रिणींकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियव्यक्तींशी भेट आनंददायी राहील. व्यापारात धनवृद्धीची शक्यता. रम्यस्थल किंवा जलाशयाच्या ठिकाणी जाण्याचे बेत ठरवाल. संततिविषयक शुभ वार्ता मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान मिळेल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचे वातावरण राहील.
तूळ:
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरदारांना बढतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. गृहस्थी जीवनात गोडी राहील. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. मातेकडून लाभ होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. सहकारी चांगले सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यश मिळेल.
वृश्चिक:
आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांचे वागणे नकारात्मक राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. राजकीय समस्या उद्भवतील.
धनु:
आज आपण खूप जपून राहा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणतेही नवीन काम औषधोपचार सुरू करू नका. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी राहील. पाण्यापासून जपा. उक्ती व कृती यांत संयम बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. निषेधार्थ कामांपासून दूर राहा. अवैध आणि सरकार विरोधी वृत्तीपासून अलिप्त राहा. तब्बेतीला जपून राहा.
मकर:
विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज ई. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल, असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील. कामात यश मिळेल. विचार अस्थिर आणि द्विधा मनःस्थिती निर्माण करतील. भिन्न लिंगीय व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. तब्बेत चांगली राहील. वाहनसुख आणि सम्मान मिळतील. नववस्त्रांची खरेदी होईल. जवळचा मनोरंजक प्रवास घडेल.
कुंभ:
श्रीगणेश सांगतात की कार्य सिद्धीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन-मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.
मीन:
आज आपण काल्पनिक जगात रमाल असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्जन करणार्यांना चमक दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून जपा. स्वभाव सांभाळा. मानसिक संतुलन जपण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
हे पण वाचा
- सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल रॅकेटच्या पर्दाफाश!१४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी
- आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० फायनल: इंडिया मास्टर्सचा दमदार विजय, वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ विकेट्सने पराभव
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.१७ मार्च २०२५
- लहान भाऊ,प्रेयसी आजी, काका,काकु कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; स्वतः विष पिऊन 23 वर्षीय तरुण पोलीस स्टेशनमध्ये हजर ‘ना पश्चात्ताप,ना डोळ्यात अश्रू’..
- संतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील वारले, आई लेकीला सोडून गेली २लाखात आजी-आजोबांनी विकलं,लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाणे गाठले.