वैशाली :- पती आवडत नसल्याच्या रागात पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ माजली. गरौल पोलीस स्टेशन जवळील रेल्वे रूळावर एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळताच परिसरात खळबळ उडाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्यापासून काही अंतरावर या तरुणाची दुचाकी रेल्वे रूळाच्या बाजूला उभी होती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. राजवीर कुमार (२४) असे या मृत तरुणाचे नाव असून तो मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहे.
माहितीनुसार, मृत तरूण त्याच्या सासरी अर्थात गरौलला गेला होता. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. मृत राजवीर कुमारचा विवाह २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जवळील बहादूरपूर गावातील रहिवासी जालंधर सिंह यांची मुलगी निशा कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीत भांडण सुरू झाले. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, निशा कुमारीला राजवीर आवडत नव्हता. निशा आणि राजकुमार यांच्यात नेहमी वाद व्हायचा. लक्षणीय बाब म्हणजे सासरच्या मंडळीकडून निशाचा छळ होत होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
१० महिन्यांपूर्वी लग्न अन्…
मृत राजवीरचे मामा पवन कुमार यांनी सांगितले की, निशा कुमारीला तिच्या पतीसोबत (राजवीर) राहायचे नव्हते. त्यामुळे तिने तिच्या माहेरच्यांसह कट रचून त्याची हत्या केली. पत्नीच्या सांगण्यावरूनच राजवीर त्याच्या सासरी गेला होता. तसेच पोलिसांनी तरुणाच्या हत्येच्या आरोपावरून राजवीरचे सासरे, सासू आणि पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. मृताच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल रॅकेटच्या पर्दाफाश!१४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी
- आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० फायनल: इंडिया मास्टर्सचा दमदार विजय, वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ विकेट्सने पराभव
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.१७ मार्च २०२५
- लहान भाऊ,प्रेयसी आजी, काका,काकु कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; स्वतः विष पिऊन 23 वर्षीय तरुण पोलीस स्टेशनमध्ये हजर ‘ना पश्चात्ताप,ना डोळ्यात अश्रू’..
- संतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील वारले, आई लेकीला सोडून गेली २लाखात आजी-आजोबांनी विकलं,लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाणे गाठले.