VIDEO: अपघात केव्हा, कधी आणि कसा होईल सांगता येत नाही. कितीही खबरदारी घेतली तरी दुर्घटना घडणे निश्चितच असते. काहीवेळा आपल्या चुकीने, तर काहीवेळा समोरच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडत असतात.यात चुकी नसतानाही अनेकदा त्रास सहन करावा लागतो. अलीकडेच अशा एका रस्ते अपघाताचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात खासकरून महिलांना बाईकवर साडी, ड्रेस, बुरखा घालून बसताना खूप काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे; अन्यथा एका चुकीमुळे तुम्हीही अपघाताचे बळी ठरू शकता.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बुरखा घातलेली एक महिला तिच्या पती आणि मुलासह बाईकवरून जाताना दिसतेय. यावेळी मूल आईच्या कुशीत बसलेलं होतं. मात्र, अचानक चालत्या बाईकच्या टायरमध्ये महिलेचा बुरखा अडकतो, ज्याने दुचाकीचा तोल डळमळतो आणि पती-पत्नीसह मूल रस्त्याच्या मधोमध पडतात. यावेळी बुरखा बाईकच्या टायरमध्ये अडकल्याने ती महिलादेखील बुरख्यासह फरफटत जाते, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.
हा व्हिडीओ शेअर करून इतर महिलांना जागरूक करण्यात आले आहे. कारण भारतात अनेक महिला साडी, ड्रेस, बुरखा घालून बाईकवर बसून प्रवास करतात. अनेकवेळा साडीचा पदर, ड्रेसची ओढणी किंवा बुरखा टायरमध्ये अडकतो. अशा परिस्थितीत अपघात होतात. यामुळे महिलांना बाईकवरून प्रवास करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण थोडासा निष्काळजीपणाही कसा मोठ्या अपघातात बदलतो, हे या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५