पांडवनगरी संस्थेतर्फे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थूबापुंच्या समाधीवर चढवली भगवी चादर, युवकांची लक्षणीय उपस्थिती.

Spread the love

एरंडोल :- येथील पांडवनगरी बहुउद्देशीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने नथ्थूबापूंच्या समाधीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत तसेच शिस्तबद्ध मिरवणूक काढून भगवी चादर चढवण्यात आली.यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांच्या हातातील श्रीराम,हनुमान व नथ्थूबापू यांचे छायाचित्र असलेले
भगवे ध्वज मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. मिरवणुकीत युवकांची संख्या लक्षणीय होती.शहरात देशभरातील हिंदू व मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थूबापूंचा उरूस सुरु आहे.उरुसानिमित्त देशभरातील हजारो भाविक शहरात दाखल झाले असून नथ्थूबापूंच्या समाधीचे दर्शन घेत आहेत.

पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सुमारे दहा वर्षांपासून नथ्थूबापुंना भगवी चादर चढवण्यात येते.संस्थेच्यावतीने शनिवारी भव्य मिरवणूक काढून नथ्थूबापुंना भगवी चादर चढवण्यात आली.कासोदा दरवाजा येथून सायंकाळी पाच वाजता भगवी चादर व नथ्थूबापूंचे छायाचित्र असलेला फलकाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.मिरवणुकीत सहभागी झालेले युवक शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच मिरवणुकीवर ठिकठीकाणी कागदी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तसेच युवकांच्या हातात असलेले भगवान राम,हनुमान आणि नथ्थूबापू यांचे छायाचित्र असलेले भगवी ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी युवकांनी प्रभू रामचंद्र की जय,बॉल बजरंगबली की जय यासह विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.रात्री नऊ वाजेच्या सुमारास पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नथ्थूबापूंच्या समाधीवर भगवी चादर चढवण्यात आली.

पहा संपूर्ण मिरवणुकीच्या व्हिडिओ

यावेळी उपस्थित हजारो युवकांनी जल्लोष केला.यावेळी नथ्थूबापू ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,जहिरोद्दिन शेख कासम,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी,भाजपचे जिल्हासचिव निलेश परदेशी,माजी नगरसेवक योगेश महाजन,सुभाष पाटील यांचेसह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणूक शांततेत पार पडली.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचारी,राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.कार्यक्रमासाठी पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, भागावी चादर उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश वाणी,सदस्य भुरा पाटील,रोहिदास महाजन,उमेश साळी,योगेश पल्लीवाल,भूषण चौधरी,वसंत पवार,मयूर बिर्ला,नितीन बोरसे,शेखर ठाकूर,गुड्डू ठाकूर,प्रशांत महाजन,सत्यं परदेशी,कुणाल पाटील,भूषण सोनार, योगेश बोरसे,भावेश साळी,पवन तिवारी,गणेश वाणी,

आकाश महाजन,नितीन जगताप,किरण लोहार, कैलास भोई,दिनेश महाजन,तुषार सोनार,गणेश सोनार रोहण
साळी,सतीश बोरसे,राजेश शिंपी,यश साळी,जितेंद्र चौधरी,गोविंद बिर्ला,सिद्धार्थ परदेशी,अमोल भोई, मुन्ना महाले,लकी महाले,मोहित परदेशी,लालू दुबे,आकाश निंबाळकर,अमोल तांबोळी,प्रशांत चौधरी यांचेसह
कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.दरम्यान पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्या पतीने पांडववाड्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील
करण्यात येते.हि विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहे.भगवीचादर मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवकांचा धार्मिक
उपक्रमांमध्ये सहभाग वाढल्याचे दिसून आले.

हे पण वाचा

टीम झुंजार