उरुसात शस्त्र घेवून दहशत पसरविणा-या युवकास पोलिसांनी केली शिताफीने अटक.

Spread the love

एरंडोल :- येथे सुरु असलेल्या नथ्थूबापूंच्या उरुसात चॉपर सारखे घातक शस्त्र घेवून भाविकांमध्ये दहशत निर्माण करणा-या एकोणावीस वर्षीय युवकास
पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडून अटक केली.यावेळी उरुसामधील भाविकांमध्ये काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.युवकास ताब्यात
घेतल्यानंतर भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबत माहिती अशी,की शहरात देशभरातील लाखो हिंदू,मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थू बापूंचा उरूस सुरु आहे.उरुसात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

उरुसानिमित्त महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर उंच पाळणे,मौत का कुवां यासह लहान मुलांसाठी विविध करमणुकीचे साधने सुरु आहेत.काल (ता.३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मौत का कुवां जवळ एक युवक संशयितरीत्या उभा असल्याचे बंदोबस्तास असलेले हवालदार अनिल पाटील,अकिल मुजावर,जुबेर खाटिक यांना दिसून आला.हवालदार अनिल पाटील,संदीप पाटील,अकील मुजावर होमगार्ड दिनेश पाटील,आर सी बी पथक यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे पोलीस पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गर्दीतून पळून जाऊ लागला.पोलीस पथकाने
त्याचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.

संशयित युवकास ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव निलेश रामकृष्ण चौधरी वय-१९ रा.बोरखेडा ता.धरणगाव असल्याचे सांगितले.पोलीस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे पस्तीस सेंटीमीटर लांबीचे धारदार चॉपर आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून चॉपर जप्त करून युवकास ताब्यात घेतले.याबाबत हवालदार अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून
पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पथकाच्या संशयीताच्या हालचाली लक्षात आल्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला आहे.

शहरात सुरु असलेल्या उरुसासाठी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल,अमोल गुंजाळ संतोष पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मध्यरात्री
उशिरापर्यंत भाविकांची गर्दी राहत असून यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.करमणुकीचे साधने असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी
होत असल्यामुळे या परिसरात टवाळखोर युवक मोठ्या प्रमाणावर फिरत असून त्यांचेविरोधात देखील पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी भाविकांनी केली
आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार