15 वर्षीय अल्पवयीन मुलीस शेतातून मोसंब्या आणायला जाण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी केला अत्याचार.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी शेतात नेऊन अत्याचार केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक गावात ही घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. संजय मच्छिद्र मोहिते आणि विलास विनायक मुळे असे आरोपींचे नावं आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीने पैठण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ती नववीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान, गावातील संजय मच्छिंद्र मोहिते व विलास विनायक मुळे हे पिडीत मुलीच्या घराच्या पाठीमागे राहतात. तर, मागील काही दिवसांपासून दोघेही पिडीत मुलीच्या घरासमोरून जातांना तिच्याकडे पाहून सारखे हसायचे. तर, दिवाळी सणापूर्वी एके दिवशी दुपारच्या सुमारास संजु मोहिते हा मुलीच्या घराच्या पाठीमागे आला. तसेच मुलीला घेऊन पत्राचे झोपडीमध्ये घेवुन गेला. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.

पुन्हा अत्याचार केला…

दरम्यान, शनिवारी 2 डिसेंबर रोजी विलास मुळे मुलीच्या घरी कोणीही नसतांना पुन्हा आला. तसेच, आपल्याला संजयच्या शेतातुन मोसंब्या आणायला जायचे असे म्हणून मुलीला घेऊन शेतात गेला. यावेळी शेतातील झोपडीजवळ संजय मोहिते देखील उपस्थित होता. यावेळी विलास मुळे याने मुलीवर पुन्हा अत्याचार केला. दरम्यान, याचवेळी मुलगी घरी जात असतानाच तिचा भाऊ तिथे आल्याने त्याने आपल्या बहिणीला कुठे चालली याबाबत विचारले असता, तिने घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा…

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तर, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. ज्यात, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविणे, पिडीत मुलीला शासनाकडुन शासकीय अर्थसहाय्य 50 लाख रु. तात्काळ मिळावे, पिडीत मुलीस शासकीय नोकरी देण्यात यावी, आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अॅट्रासिटी कायद्याचे कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीस तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, पिडीत मुलीस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार