यू.पी.च्या तरुणाची पब्जी खेळताना तरुणीशीझाली ओळख,भेटण्यास आला सातारा,विवस्त्र फोटो व्हायरलची धमकी देऊन केला तरुणीवर अत्याचार,

Spread the love

सातारा : विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १९ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, संबंधित तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. उवैश नसीम अन्सारी (वय २४, रा. माैदाहा, ता. रागोल, जि. हमीदपूर, राज्य उत्तर प्रदेश), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पब्जी गेम खेळताना संबंधित तरुणीची उवैश याच्याशी ओखळ झाली.

त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये तो भेटण्यासाठी साताऱ्यात आला. त्यानंतर दोघेही अजिंक्यतारा किल्ला येथे गेले. त्याने तेथे तिचा विनयभंग केला. पुढे व्हॉट्सॲपवर सातत्याने विवस्त्र व्हिडीओ, फोटो देण्यासाठी तो धमकी देऊ लागला. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुन्हा तो अजिंक्यतारा किल्ला येथे आला. तेथे काढलेले फोटो व तरुणीने पाठवलेले विवस्त्र फोटो ‘तुझ्या आई-वडिलांना पाठवेन,’ अशी धमकी देऊ लागला. तसेच २२ फेब्रुवारीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केला.

ते रेकॉर्डिंग घरातील लोकांना पाठवेन, अशी धमकी देऊन पुन्हा २४ ऑगस्ट रोजी त्याच लाॅलवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार अखेर असह्य झाल्याने पीडित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात सोमवार, दि. ४ रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार