“तु जर मध्ये पडलास तर तुझ्याकडे पाहून घेऊ” असे नवविवाहीत तरुणास म्हणत नातेवाईकांनी केले नववधूचे अपहरण

Spread the love

अहमदनगर :- आळंदी मध्ये प्रेमविवाह करून आलेल्या नववधूचे १५ ते २० अनोखळी नातेवाईकांनी अपहरण केल्याची घटना दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील टाकळीमिया येथ घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्‍यातील टाकळीमिया परिसरातील भुवन दादासाहेब गुंड या तरूणाचे व राहुरीच्या पूव॑ भागातील तरूणीचे प्रेमसंबध होते.त्या दोघांनी दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आळंदी या ठिकाणी पळून जाऊन कायदेशीर लग्न केले.

त्यानतंर ते प्रेमीयुगल दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. ‘पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तरूण व तरूणीचे नातेवाईक राहुरी पोलीस ठाण्यात आले; मात्र काहींनी मध्यस्ती करून त्यांच्यात समझोता घडवून आणला.त्यानंतर हे नवविवाहित जोडपे नवरदेवाच्या गावी टाकळीमियॉ येथे गेले. चहापाणी घेण्यासाठी आपल्या नातेवाईकाच्या घरी गेले. नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर तेथे १५ ते २० अनोळखी इसम आले.त्यांनी आम्ही मुलीचे नातेवाईक असून आम्हाला तिच्याशी बोलायचे आहे, असे सांगीतले.

तेव्हा तीचा नवरा त्यांना म्हणाला, मी तीच्याशी कायदेशिर विवाह केला आहे. जे काय बालायचे, माझ्या समोर बोला. त्यावेळी त्या मुलीच्या अनोखळी नातेवाईकांनी “तु जर मध्ये पडलास तर तुझ्याकडे पाहून घेऊ’ अशी दमदाटी करून त्या नववधूला चारचाकी गाडीत बळजबरीने घालून पळवून नेले.भुवन दादासाहेब गुंड (वय २२ वर्षे, रा. टाकळीमिया) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात १५ ते २० अनोळखी इसमांविरोधात गून्हा रजि. नं. १३१८/२०२३ नुसार भादंवि कलम ३६३, ५०६ प्रमाणे अपहरणाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार