एरंडोल :- प्रसिद्ध शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी उद्योगसमुहाचे संचालक अनिल काबरा,दिनेश काबरा आणि संजय काबरा यांच्या निवासस्थानी भेट देवून काबरे परिवाराला आशीर्वाद दिले.दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा शहरात येणार असल्याची माहिती समजताच भाविकांनी मारवाडी गल्ली,अमळनेर दरवाजा या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.पंडित प्रदीप मिश्र यांच्या शिवकथेचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
शिरपूर येथून जळगाव येथे जात असतांना पंडित प्रदीप मिश्रा यांनी एरंडोल येथील प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या काबरा परिवाराच्या गणपती निवास येथे भेट दिली.यावेळी बालाजी उद्योग समुहाचे संचालक अनिल काबरा,दिनेश काबरा,संजय काबरा यांचेसह परिवारातील सदस्यांनी पंडित मिश्राजी यांचे फुलांचा वर्षाव करून आणि औक्षण करून स्वागत
केले.संचालक दिनेश काबरा.प्रसाद काबरा यांनी पंडित मिश्रा यांचा सत्कार केला.
बालाजी ग्रुपचे संचालक शंतनू काबरा,गौतम काबरा यांचेसह परिवारातील सदस्य,महिला सदस्य आणि कर्मचा-यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे पूजन करून
आशीर्वाद घेतले.दरम्यान शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा शहरात येत असल्याचे समजताच हजारो भाविकांनी दुपारी चार वाजेपासूनच काबरा परिवाराचे
निवासस्थान असलेल्या मारवाडी गल्लीत दर्शनासाठी गर्दी केली होती.यामध्ये युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती.यावेळी उपस्थित भाविक हरहर महादेव
च्या घोषणा देत होते.
सुमारे चार तास भाविक पंडितजींची प्रतीक्षा करीत
होते.रात्री आठ वाजेच्या सुमारास पंडितजींचे अमळनेर दरवाजा मार्गे शहरात आगमन झाले.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आणि इमारतींवर उभ्या असणा-या भाविकांनी पंडितजींवर फुलांचा वर्षाव केला.अमळनेर दरवाजा ते भगवा चौकापर्यंत रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.काबरा परिवाराच्या गणपती निवासस्थानाच्या galaryतून पंडित मिश्रांनी सर्व
भाविकांना अभिवादन केले त्यावेळी सर्वांनी हरहर महादेवच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता.
पंडित प्रदीप मिश्रा यांनी काबरा परिवार आणि
त्यांच्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेतली.पंडित प्रदीप मिश्रांच्या भेटीमुळे आणि आशीर्वादामुळे धान्य झालो असल्याची प्रतिक्रिया काबरा परिवारातील सदस्य अनिल काबरा,दिनेश काबरा,संजय काबरा यांनी व्यक्त
केली.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.