मोहाली :- बढाई मारण्यासाठी किंवा इम्प्रेशन पडावं म्हणून कोण काय करील, काही सांगता येत नाही. नुकतीच पंजाबात घडलेली घटना याचंच एक उदाहरण आहे. मोहालीतल्या एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी असा स्टंट केला, की दुसऱ्या एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट त्यामुळे जळला. ही घटना दोन डिसेंबरला घडल्याचं सांगितलं जात आहे. त्या दिवशी पोलिसांना एका व्हायरल व्हिडिओची माहिती मिळाली.
रवित कपूर नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी आपल्या आलिशान मस्टँग गाडीच्या डिकीला फायर क्रॅकर्स स्काय शॉट जोडला. तो पेटवून तो गाडी चालवत होता. हा कारनामा शूट करण्यासाठी त्या व्यक्तीने पाठीमागून येणाऱ्या एका ऑटो ड्रायव्हरला कथितरीत्या पैसे दिले होते. त्या स्काय शॉटमुळे पाठीमागून येणाऱ्या एका स्कूटरवरच्या युवकाला दुखापत झाली. त्याचा प्रायव्हेट पार्ट त्या दुर्घटनेत जळला. पोलिसांनी पीडिताची ओळख गुप्त राखली आहे.

आरोपी रवित कपूरला अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहालीमध्ये इमिग्रेशनचं काम करतो. त्याच्या वडिलांचं चंडीगडच्या सेक्टर 19मध्ये कपड्यांचं शोरूम आहे. बड्या बापाच्या या मुलाचा हा असा पहिला कारनामा नाही. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे त्याच्या आलिशान मस्टँग गाडीवर आतापर्यंत 14 वेळा वाहतूक विभागाकडून चलन निघालं आहे. त्यापैकी सर्वांत अलीकडचं चलन 2022 सालातलं केरळमध्ये अति वेगाने गाडी चालवल्याबद्दलचं आहे. अन्य 13 चलनं चंडीगडमधली आहेत.
म्हणजेच आरोपीला कायमच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्याची सवय होती, असंही यावरून दिसून येतं. आरोपीच्या मस्टँग गाडीला व्हीआयपी नंबरही आहे.डीएसपी हरसिम्रन बल यांनी सांगितलं, की आरोपी रवितने आपली मस्टँग गाडी दिल्लीतल्या कोणा व्यक्तीला विकली आहे. फेज-8 पोलीस ठाण्याची टीम ती मस्टँग गाडी ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला गेली आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या ऑटो ड्रायव्हरचाही शोध घेतला जात आहे. कोणाच्या नसत्या थेरांचा निष्पाप व्यक्तीला कसा त्रास होऊ शकतो, हे या घटनेवरून पाहायला मिळतं. कायम सावधगिरी बाळगून वाहनं चालवणं एवढंच सर्वसामान्यांच्या हातात असू शकतं.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.