चाऴीसगाव शहर पोलिसांनी चोरट्यास अवघ्या 3 तासात केली अटक, वधू व वराकडील नातेवाईकांनी पोलिसांवर केला कौतुकाच्या वर्षाव.
चाऴीसगाव :- शहर पोस्टे हद्दीत दिनांक 07/12/2023 रोजी रात्री 09.30 वा.च्या सुमारास शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यातील फिर्यादी यांचेकडेस नवरीचे सोन्याचे दागीणे, रोख रुपये व ऍ़पल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले होता व ती पर्स सोबत घेवुन त्या लग्न ठिकाणी नातेवाईकांना भेटी-गाठी घेत असतांना त्यांच्याकडुन दागीने ठेवलेली पर्स एका टेबलावर ठेवली गेली.

त्यानंतर फिर्यादी ह्या नातेवाईकांना भेटुन सदर पर्स घेण्यास गेली असता पर्स त्या ठिकाणी मिळुन आली नाही, म्हणुन त्यांची खात्री झाली की कोणातरी अज्ञात चोरट्याने त्यांची सोन्याचे दागीणे, रोख रुपये व मोबाईल ठेवलेली पर्स चोरुन नेली आहे. त्यावरुन चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 556/2023 भादंवि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर मा.श्री.एम. राजकुमार पोलीस अधिक्षक सोा जळगांव यांच्या आदेशान्वये मा.श्री.रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ तसेच मा.श्री.अभयसिंह देशमुख सहा.पोलीस अधिक्षक उप विभाग चाळीसगांव
आम्ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि.योगेश माळी, पोना/दिपक पाटील, पोकॉ/नंदु महाजन, पोकॉ/अजय पाटील, पोहेकॉ/राहुल सोनवणे, पोकॉ/विनोद खैरनार, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोहेकॉ/नितीन वाल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच घटनास्थळी आलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रोडवरील असलेल्या इतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल चालक यांना चोरी करणाऱ्या इसमाचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीतास बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी यांनी सांगीतलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे बालवीर माखन सिसोदीया वय-19 वर्षे रा. गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) याचा चाळीसगाव शहर परिसरात शोध घेता तो मिळून आल्याने त्यास गुन्ह्यामध्ये ताब्यात घेवुन अटक कऱण्यात आलेली आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेल्या 6,85,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलिसांनी खबर प्राप्त होताच 03 तासांपेक्षा कमी कालावधीत उघडकीस आणल्यामुळे पोलिसांचे कामाचे वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून गौरवण्यात आले ..सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोना/3122 दिपक पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार असे करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






