पारोळा,एरंडोल l प्रतिनिधी :- तेली समाजाचे आराध्यदैवत ग्रंथकार संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज रोजी समाज बांधवांवतीने व विविध शासकीय कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील हत्ती गल्लीमधील जुन्या तेली भवन येथे श्री संताजी महाराज मंदिरात गोपाल चौधरी या नवदांपत्यांच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला.

त्यानंतर समाजातील समाज बांधव व नूतन कार्यकारणी पंचमंडळ यांनी आझाद चौक येथे पायी जाऊन श्री संताजी जगनाळे महाराज यांचा भव्य दिव्य अश्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा पाठ केली. प्रसंगी तेली समाज समाज कार्यकारणी पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, संजय चौधरी सतीश चौधरी, मनोज चौधरी, दिलीप चौधरी साहेबराव चौधरी, विश्वास चौधरी, कपिल चौधरी, गोकुळ चौधरी,नवल चौधरी, किशोर चौधरी, रवींद्र चौधरी, अनिल चौधरी, दिलीप चौधरी, भास्कर चौधरी, सुरेश चौधरी, किरण चौधरी या पंच मंडळ सह संजय चौधरी, प्रल्हाद चौधरी, धर्मदास चौधरी, सुदाम चौधरी, भागवत चौधरी, वामन चौधरी,प्रवीण चौधरी सह समाजातील अनेक बाधंव उपस्थित होते.
एरंडोल शहरात
एरंडोल येथे शहराच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंतीनिमित्ताने प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख आनंदा चौधरी भगत या मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी ,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, शिवसेना शहर प्रमुख आनंदा चौधरी (भगत ),तेली समाज तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी, यांच्या हस्ते संताजी महाराजांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
माजी उपनगराध्यक्ष संजय चौधरी,अनिल चौधरी , चंद्रकांत चौधरी , गोरख चौधरी राष्ट्रवादी शहराध्यक्ष, राजेंद्र चौधरी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष, आर एस पाटील शहराध्यक्ष काँग्रेस ,विक्रम चौधरी ,आर पी चौधरी, प्रमोद महाजन ,उद्धव ठाकरे गट युवक शहर प्रमुख शुभम चौधरी, कैलास चौधरी, रवी चौधरी, संतोष चौधरी, नितीन चौधरी, रमेश चौधरी, योगेश चौधरी ,व तेली समाज बांधव उपस्थित होते.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.