तुमकुरू (कर्नाटक) :- चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. चित्रपटांमध्ये जे दाखवले जाते त्याचे बरेच वेळा अनुकरण केले जाते. परंतु अनेक वेळा चित्रपटातूनच लोकांना नवीन आयडियाही मिळतात. असाच एक प्रकार कर्नाटकातून समोर आला असून, पोलिसांसमोरच एका व्यक्तीने फिल्मी स्टाईलमध्ये पोलिस व्हॅन घेऊन पलायन केले. त्यानंतर काय घडलं ते जाणून घ्या.तुमकुरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील नारानहल्ली गावात ही घटना घडली.
सोमवारी, २७ नोव्हेंबरला रात्री उशिरा मुनिया अन्नुता या इसमाचे मोठ्या भावासोबत काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. हळूहळू प्रकरण वाढत गेले. दरम्यान, मुनियाच्या भावाने फोन करून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी लहान भाऊ मुनिया याने पोलिसांच्या वाहनावर मागून दगडफेक केली. आवाज ऐकून वाहन चालक खाली उतरून वाहनाचा मागील भाग तपासण्यासाठी गेले. तेव्हा संधी साधून मुनिया रिकाम्या वाहनात चढला आणि गाडी सुरू करून पळून गेला.
मुनियाच्या या कृतीने सगळेच थक्क झाले. पोलिसांसमोरच त्यांच्या उपस्थितीत मुनिया वाहन घेऊन पळून गेल्याने सारेच हबकले. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीसही चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी मुनिया पोलिसांना चकवा देत राहिला. सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर मुनियाला पकडण्यात पोलिसांना यश आले. कंगाला पोलिसांनी तुमकूर तालुक्यातील हेब्बुरूजवळ पोलिसांचे वाहन जप्त केले आणि आरोपी मुनियाला ताब्यात घेतले.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५