प्रतिनिधी । अमळनेर
प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार शहरात शनिवारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ६ टेम्पो रिक्षा जप्त करून गुन्हा दाखल झालाआहे.
शहरात विविध ठिकाणी ४ पथकांना अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे ६ टेम्पो आढळून आलेत. ते सर्व टेम्पो अमळनेर पोलिस ठाण्यात जमा करून टेम्पो मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकात टाकरखेडे मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ, अमळनेर मंडळ अधिकारी टाकरखेडे एन. डी धनराळे, हेडावे मंडळ अधिकारी वाय. आर पाटील, नगाव मंडळ अधिकारी व्ही. पी. पाटील, पिंगळवाडे तलाठी स्वप्नील कुळकर्णी, अमळगाव तलाठी पराग पाटील, दोधवद तलाठी वाल्मीक पाटील, भरवस तलाठी बळीराम काळे, सावखेडा तलाठी सतीश शिंदे, मुडी प्र. डांगरी तलाठी प्रदीप भदाणे, टाकरखेडे तलाठी महेश आहिरराव, अमळनेर शहर तलाठी ए.बी. सोनवणे, वावडे तलाठी तिलेश पवार, सडावण तलाठी प्रमोद माळी, दहिवद तलाठी महेंद्र पाटील, गलवाडे तलाठी आय.एस. महाजन आदी सहभागी झाले होते. दरम्यान महसूल प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईचे सर्वांकडून स्वागत होत आहे.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






