संशयित हर्षवर्धनने मॉर्फ करून अश्लील फोटो तिच्या व्हॉट्सअॅपवर टाकला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली. सांगली : विवाहित डॉक्टर महिलेवर बलात्कार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या संशयितास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.हर्षवर्धन अंकुश कुंभार (सध्या पाटण, सातारा) असे त्याचे नाव आहे. संशयित कुंभार हा मूळचा कऱ्हाड तालुक्यातील शेरे येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी माहिती दिली, की पीडित महिला डॉक्टर आहे. सन २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून संशयिताशी ओळख झाली. मैत्री म्हणून ते फेसबुकवर चॅटिंग करत असत. दरम्यानच्या काळात संशयिताने अडचण सांगून पीडितेकडून ५० हजार रुपये उसनवार घेतले. नंतर फिरायला जायचे असल्याची थाप मारून नेले व कोल्हापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी पीडितेने उसनवार दिलेल्या पैशांची मागणी केली. संशयित हर्षवर्धनने मॉर्फ करून अश्लील फोटो तिच्या व्हॉट्सअॅपवर टाकला.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणी येऊन तिला बेदम मारहाण केली. धमकी देऊन चारचाकीतून घेऊन जाऊन एका निर्जन ठिकाणी पुन्हा लैंगिक अत्याचार केला. नंतर पीडितेने पोलिसांत धाव घेऊन घडल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला काल न्यायालयात हजर केले असता १४ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






