मुक्ताईनगर :- मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, असा सारखा तगादा लावणार्या प्रेयसीला कंटाळून 28 वर्षीय प्रियकराने किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये एक वर्षांपासून प्रेम निर्माण झाले मात्र तरुणीने लग्नासाठी तगादा सुरू केला तसेच लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, अशी मागणी केली तसेच रक्कम न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.गुरुवार, 7 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखली शिवारातील शेतात तरुणासोबत पुन्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला व लग्न न केल्यास चार लाखांची मागणी केली

तसेच तरुणीसोबतच्या मैत्रिणीनेदेखील चिथावणी दिली. धमकीला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन केले व त्यास उपचारार्थ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रघुनाथ पवार करत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






