Viral Video: सिग्नलवर गाड्या थांबल्या अन् एक तरुणी रस्त्यावर झोपून करू लागली हटके डान्स ……पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकजण प्रकाशझोतात येत असतात. अनेक तरूण- तरूणींनीमध्ये सोशल मीडियावर फेसम होण्यासाठी चढाओढ पाहण्यास मिळत आहे. मुंबईत असो वा इतर सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवण्याचे प्रमाण वाढले आहे.अशातच सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय, ज्यात ती भररस्त्यावर वाहतुकीच्या गर्दीत बिनधास्त रीलसाठी डान्स करताना पाहायला मिळत आहे.

तरुणीचा हटके डान्स….

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकतो, भरदिवसा एका रस्त्यावर रिक्षा, बाईकची तसेच लोकांची वर्दळ दिसून येतेय. दरम्यान त्या रस्त्यावर सिग्नल लागतो. यामध्ये एक तरूणी रस्त्याच्यामधोमध येते आणि डान्स करण्यास सुरूवात करते. कहर तर तेव्हा होता जेव्हा तरूणी रस्त्याच्यामधोमध येऊन चक्क खाली झोपून डान्स करते. यात असे दिसते की ती रिल्स बनवण्याच्या नादात असा विचित्र डान्स करत आहे. तरूणीने फॅशनेबल टॉप आणि जीन्स परिधान केलेली आहे. तरूणीचा व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मच्या @desimojito या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

तसेच कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,इतना आत्मविश्वास’. परंतूहा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. आतापर्यंत तुम्ही बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला असेल. मात्र, वाहतुकीच्या ठिकाणी भर रस्त्यावर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्यात. कमेंट बॉक्समध्ये यूजर्संनी तरूणीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की,प्रत्येकजण लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यात व्यस्त आहे’. तर आणखी एका यूजरने लिहिल आहे की,पृथ्वी हादरली असती’. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज आणि लाईक्स् मिळालेत.

हे पण वाचा

टीम झुंजार