येणारा दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे.
वृषभ:
आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल कारण, तुम्ही त्यांच्या सोबत बोलण्यात काही ही आवड दाखवणार नाही. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता.
मिथुन:
देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल.
कर्क:
तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्ही वर सिनेमा पाहून आपला किमती वेळ घालवतील. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

सिंह:
आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील.
कन्या:
तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.
तूळ:
आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
वृश्चिक:
आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका कारण नजिकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात.
धनु:
आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
मकर:
प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.
कुंभ:
प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे
मीन:
तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात.
हे पण वाचा
- सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल रॅकेटच्या पर्दाफाश!१४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी
- आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० फायनल: इंडिया मास्टर्सचा दमदार विजय, वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ विकेट्सने पराभव
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.१७ मार्च २०२५
- लहान भाऊ,प्रेयसी आजी, काका,काकु कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; स्वतः विष पिऊन 23 वर्षीय तरुण पोलीस स्टेशनमध्ये हजर ‘ना पश्चात्ताप,ना डोळ्यात अश्रू’..
- संतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील वारले, आई लेकीला सोडून गेली २लाखात आजी-आजोबांनी विकलं,लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाणे गाठले.