धक्कादायक! नवविवाहीत जोडपं गेलं हनिमूनला, अतिउत्साहच्या भरात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा मृत्यू काय आहे प्रकरण वाचा.

Spread the love

नवी दिल्ली :- जगातील अनेक लोकांना अॅडव्हेंचर खूप आवडतं. पण हे अनेकदा जीवघेणंही ठरतं. बंजी जंपिंगपासून ते स्काय डायव्हिंगपर्यंत जवळजवळ सर्व अॅडव्हेंचर स्पोर्ट धोकादायक असतात.वॉटर अॅडव्हेंचरबद्दल बोलायचं झालं तर पाण्यात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांच्या हल्ल्याचाही इथे धोका असतो. नुकतंच याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.बहामासमध्ये वॉटर स्पोर्ट्सदरम्यान एक भीषण अपघात झाला. यात एका शार्कने हनिमूनला आलेल्या नवविवाहित महिलेचा जीव घेतला.

ही महिला बहामासमधील सँडल्स रिसॉर्टपासून थोड्या अंतरावर पॅडलबोर्डिंग करत होती, तिच्या लग्नाच्या एक दिवसानंतरच तिच्यावर शार्कने हल्ला केला.स्थानिक बातम्यांनुसार, हल्ल्याच्या वेळी पीडिता तिच्या पतीसोबत होती. पॅडलबोर्ड चालवत असताना एका शार्कने तिच्यावर पाण्यातच जोरदार हल्ला केला. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये असं दिसत आहे की, जेव्हा लाइफ गार्ड्सने महिलेवर हल्ला झाल्याचं पाहिलं तेव्हा ते पळत गेले आणि तिला रक्ताळलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर आणलं आणि नंतर तिला रुग्णालयात नेलं.

रॉयल बहामियन पोलीस सार्जंट देसरी फर्ग्युसन यांनी पत्रकारांना सांगितलं की, “सकाळी 11.15 वाजता पोलिसांना माहिती मिळाली की युनायटेड स्टेट्समधील एका महिला पर्यटकावर शार्कने हल्ला केला आहे. आमच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, ही महिला वेस्टर्न न्यू येथील एका रिसॉर्टच्या मागे होती तिच्या पतीसोबत पॅडलबोर्डिंग करत होती, तेव्हा पाण्यातून बाहेर आलेल्या शार्कने तिच्यावर हल्ला केला”.हल्ल्यानंतर ड्यूटीवर असलेल्या लाइफगार्डने तिला सुरक्षित स्थळी नेऊन जखमी महिलेला तातडीने सीपीआर दिला.

तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान महिलेला मृत घोषित करण्यात आलं. एका जेट स्की ऑपरेटरने नासॉ गार्डियनला सांगितलं, की त्याने किनाऱ्यावरून हल्ला पाहिला. तो म्हणाला- ‘हे माझ्यासाठी भीतीदायक होतं, कारण थोड्याच वेळापूर्वी मी तिला हसताना आणि पॅडल बोर्डिंगला जाताना पाहिलं होतं. मात्र काही वेळाने पॅडलबोर्डवर एकच मुलगा असल्याचं दिसून आलं आणि हल्ल्यामुळे तरुणी पाण्यात पडली होती.’

हे पण वाचा

टीम झुंजार