धक्कादायक! स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करण्याची भावाची इच्छा मामाने समजविण्याच्या केला प्रयंत्न, शेवटी जे घडल ते भयानक.

Spread the love

गाझियाबाद :- जिल्ह्यातल्या साहिबाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे एका तरुणाचा त्याच्या सख्ख्या मामानं खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह इतर साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आलंय.

गाझियाबाद जिल्ह्यातल्या साहिबाबादमधल्या राजीव कॉलनीत नितीन (पूर्ण नाव माहिती नाही) हा युवक राहत होता. या युवकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत नितीनचा मामा आणि आणखी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनला त्याच्या मावस बहिणीशी लग्न करायचं होतं. त्यावरून नितीन व आरोपींमध्ये वाद झाला. त्यातून आरोपींनी नितीनचा खून करून त्याचा मृतदेह हिंडन नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपींकडून घटनेत वापरलेली दुचाकी आणि सर्जिकल ब्लेड जप्त केलंय.

असा झाला खुनाचा उलगडा

पोलीस अधिकारी शुभम पाटील यांनी सांगितलं, की ‘नितीन 29 नोव्हेंबर 2023 रोजी बेपत्ता झाला होता. 6 डिसेंबर 2023 रोजी हिंडन नदीत त्याचा मृतदेह सापडला होता. त्याच्या गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर शवविच्छेदन रिपोर्टमध्ये नितीनची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला असता नितीन बेपत्ता होण्यापूर्वी त्याचा मामा शिवकुमारसोबत असल्याचं समोर आलं होतं. शिवकुमार याचं मोहननगर परिसरात मोबाइल रिपेअरिंगचं दुकान आहे. पोलिसांनी शिवकुमाला अटक करताच त्यानं हत्येची कबुली दिली. तसंच भानुप्रताप यानेही नितीनचा खून करण्यात मदत केली असल्याचं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी भानुप्रताप यालाही अटक केली आहे.’

म्हणून केला खून

नितीनचा खून का करण्यात आला, याचंही कारण समोर आलं आहे. पोलिस अधिकारी शुभम पाटील यांनी सांगितलं, की दारूच्या नशेत असताना नितीनने शिवकुमारची भाची म्हणजेच आपल्या मावस बहिणीशी लग्न करणार असल्याचं शिवकुमारला सांगितलं. शिवकुमारने याला विरोध केला असता नितीनने त्याला शिवीगाळ केली. त्यावर शिवकुमार आणि भानुप्रताप यांनी सर्जिकल ब्लेडने नितीनचा गळा चिरला. यानंतर त्याचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन हिंडन नदीत फेकून दिला. मृतदेह वर येऊ नये, म्हणून नितीनच्या जॅकेटमध्ये काही दगड टाकले. तसंच नितीनचा मोबाइल तोडून तो त्याच्याच खिशात टाकला. घटनेनंतर शिवकुमार चार दिवस अलीगढमध्ये एका नातेवाईकाच्या घरी थांबला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार