जळगाव :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) परिसरात दोन ठेकेदारांच्या गटात वाद होऊन तलवार हल्ला झाला. अधिकाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावली गेली. माहितीचा फोन जिल्हापेठ पोलिसांना कार्यालयातून गेला. तातडीने या ठिकाणी जिल्हापेठ पोलिसांसह सीआयडी पोलिस रवाना झाले. या ठिकाणी उपस्थित गट, कार्यालयातील कर्मचारी काही माहीत नसल्याचे सांगत हात वर करून मोकळे झाले. मात्र, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जैयस्वाल यांनी या कार्यालयाच्या परिसरात काय हाणामारी झाली याची माहिती पुराव्यानिशी द्यावी , असे लेखी पत्र पीडब्ल्यूडीला दिले आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजता पीडब्ल्यूडी कार्यालय आवारासह अधिकाऱ्यांच्या दालनात दोन गटात शहरातील काव्यरत्नावली चौक ते महाबळ कॉलनी दरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या निविदेवरून शहरातील ठेकेदार व एरंडोल येथील पहिलवान नामक ठेकेदार यांच्या समर्थकांच्या गटात वाद होऊन हमरीतुमरीपर्यंत प्रकरण गेले. एका गटाने तलवारीने वार केले तर दुसऱ्याने थेट पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याच्या कानाला बंदूक लावल्याची वार्ता पसरली. जिल्हापेठ पोलिसांना या विभागाच्या नाशिक येथे गेलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने फोन करून या घटनेची माहिती कळवल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल हे ताफ्यासह पोहोचले.
या ठिकाणी उपस्थितांनी काहीच झाले नसल्याचे सांगितले. दरम्यान, शहरातील इतर पोलिस ठाण्याचा पोलिस ताफाही तेथे आला. वाद झाला मात्र, आम्हाला माहिती नाही, अशीच माहिती या विभागाकडून समोर आली. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने घटनेची सत्यता पडताळणी करता आली नाही. त्यानंतर पोलिस पथक रवाना झाले. मात्र, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. जैस्वाल यांनी पीडब्ल्यूडी विभागाला या हाणामारीच्या घटनेची माहिती व पुरावे पोलिस ठाण्याला द्यावे, असे लेखी पत्र दिले आहे.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






