जबलपूर :- धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कमलेश कुशवाह (वय २२ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तैनात पोलीस दलासाठी स्पेशल ट्रेन चालवण्यात आली होती.पोलिसांना सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी ट्रेनमध्ये कुणीच नव्हतं. पीडित महिलेला उचाहर येथे जायचं असल्याने ती या ट्रेनमध्ये चढली. दरम्यान, आरोपी कमलेश हा ट्रेनमध्ये आधीपासूनच हजर होता. त्याने महिलेला टॉयलेटमध्ये जाताना बघितलं. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने कमलेशने पीडितेला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
इतकंच नाही, तर त्याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार देखील केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला ट्रेनमधून ढकलून दिलं. अंगावर अर्धवट कपडे असतानाही पीडिता जखमी अवस्थेत जवळच्या पोलीस स्थानकात पोहचली.महिलेवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच सतना पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपीने ट्रेनच्या डब्यात स्वत:ला कोंडून घेतलं होतं. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.