यावल :- एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू पण माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणत अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग केला. तसेच तिचा भावास मारहाण केली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल शहरातील एका भागात अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून, साने गुरूजी विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थीनी ही बुधवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३o वाजेच्या सुमारास विद्यालयात जात असताना विद्यालयासमोर लोकेश सुनिल महाजन (रा. देशमुख वाडा यावल) या तरुणाने दुचाकी आडवी लावून अल्पवयीन पीडितेचा हात पकडून ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू पण माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणत तिचा विनयभंग केला.
छेडखानी झालेल्या घटनास्थळी अल्पवयीन मुलीचा भाऊ आला व त्या तरुणास माझ्या बहीणीचे नाव का घेतले असे विचारले असता लोकेश महाजन याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या कहैन्या देशमुख व वैभव देशमुख यांनी त्यास चापटाबुक्यानी मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तिन तरूणांविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा