यावल :- एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू पण माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणत अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग केला. तसेच तिचा भावास मारहाण केली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल शहरातील एका भागात अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून, साने गुरूजी विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थीनी ही बुधवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३o वाजेच्या सुमारास विद्यालयात जात असताना विद्यालयासमोर लोकेश सुनिल महाजन (रा. देशमुख वाडा यावल) या तरुणाने दुचाकी आडवी लावून अल्पवयीन पीडितेचा हात पकडून ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू पण माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणत तिचा विनयभंग केला.
छेडखानी झालेल्या घटनास्थळी अल्पवयीन मुलीचा भाऊ आला व त्या तरुणास माझ्या बहीणीचे नाव का घेतले असे विचारले असता लोकेश महाजन याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या कहैन्या देशमुख व वैभव देशमुख यांनी त्यास चापटाबुक्यानी मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तिन तरूणांविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.
हे पण वाचा
- “हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा” पतीने केला पोलिस स्टेशनमध्ये फोन, धक्कादायक कारण आलं समोर.
- पारोळा तालुक्यात व्यापारी दाजीने मेहुण्याची ५३ लाख रुपयांची विमाची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याच्या केला खून अन् अपघाताच्या केला बनाव पण…….
- ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये मग केलं लग्न, पत्नीला लागली सरकारी नोकरी अन् तिची सटकली इंजिनिअर नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.
- पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास; १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय.
- गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला मी शोधण्यास मदत करेल तू आधी माझ्याशी संबंध ठेव पोलिसांने केली महिलेकडे मागणी.