कानपूर :- बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने नवऱ्याच्या मदतीने प्रियकराची हत्या केली आहे. अरुणेश मिश्र असं मृत व्यक्तीचे नाव असून तो बांदा जिल्ह्यातील बाहेरू कोतावली परिसरातील सत्यवान गावात राहायचा. तो एक शेतकरी होता : मे महिन्यात अरुणेशचे लग्न वर्षा मिश्रासोबत झाले. वर्षा पाच महिन्यांची गरोदर आहे. १० डिसेंबर रोजी वर्षा आणि अरुणेशचे शेवटचे बोलणे झाले. तेव्हापासूनच तो बेपत्ता होता. या घटनेत देवेश नामदेव असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. तो अरुणेशचा मित्र होता.
याबाबत अरुणेशचा मोठा भाऊ कमलेश मिश्राने माहिती दिली. अरुणेश हा नेहमी देवेश नामदेवच्या घरी जायचा. ते दोघे मित्र होते. अरुणेशने देवेशला पैशाची देखील मदत केली होती. देवेशच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला खूप मदत केली होती. त्याला २५ हजार रुपये दिले होते. तसेच दोन वर्षापूर्वी त्याला कॉलनीत राहण्यासाठी जागा दिली होती. अरुणेश देवेशच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. संपूर्ण कुटुंबाचा देवेशवर खूप विश्वास होता. त्यानेच विश्वास घात केला, असं तो म्हणाला.अरुणेशचा मृतदेह घरापसून २०० मीटर अंतरावर असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत सापडला. ११ डिसेंबरला जेव्हा शाळा उघडण्यात आली, तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांना याबद्दल कळले. शाळेच्या मागील बाजूस शौचालयाजवळ हा मृतदेह सापडला.
कोतवाली पोलिसांनी २४ तासातच या संपूर्ण घटनेचा उलगडा केला. आरोपी देवेशला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अरुणेश देवेशची पत्नी गीताच्या संपर्कात होता. देवेशने अनेकदा अरुणेशला पत्नी गीतापासून लांब राहण्यास सांगितले होते. परंतु त्याने हे ऐकले नाही. त्यानंतर देवेशने गीतासोबत मिळून अरुणेशच्या हत्येचा प्लान केला.१० डिसेंबरला रात्री गीताने अरुणेशला शाळेत बोलावले. त्यानंतर मागून देवेशने त्याचा नायलॉनच्या दोरीने गळा दाबला. त्यात दोरी तुटली. त्यामुळे त्यांनी खिळा त्याला गळ्यात आणि छातीत घुसवला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शाळेच्या मागे झाडाझुडपात लपवण्यात आला होता.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.