जळगाव:- एरंडोल तालुक्यातील उत्राण आणि यावल तालुक्यातील अट्रावल येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे.याबाबतची माहिती एल. सी. बी. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी १४ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (वय-४१ रा. अट्रावल ता. यावल) आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील (भिकन रमेश कोळी वय-३५ रा. उत्राण ता. एरंडोल) या दोघांना स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस ठाण्याच्या वतीने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात देण्यात आला.
दरम्यान या प्रस्तावाचे अवलोकन करत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजूरीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोघांवर स्थानबध्दतेच्या कारवाईला मंजुरी दिली आहे. यात गुन्हेगार दिवाकर उर्फ पिंटू टोपलु तायडे याला कोल्हापूर येथील कारागृहात तर दुसरा गुन्हेगार भिकन रमेश कोळी याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे.
यातील भिकन रमेश कोळी हनिलॉन्स कंपनीच्या कामगारांमध्ये आंदोलन तसेच व्यवस्थापनकडे खंडणी मागणी त्याचप्रमाणे कोळी बांधवांच्या जळगावच्या उपोषणाच्या वेळी कलेक्टर याच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून घेणे अर्वाची व अश्लील घोषणाबाजी यासारख्या गुन्ह्यांमुळे त्याला कारवाईला सामोरे जावे लागले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






