आग्रा :- अनैतिक संबंधांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची प्रकरणं आपल्या ऐकायला किंवा पाहायला मिळतात. बऱ्याचदा अशा बाबतीत फसवणूक करणाऱ्याचं बिंग फुटतं आणि मग मोठा गोंधळ होतो.उत्तर प्रदेशातील आग्रा इथं अनैतिक संबंधांची अशीच एक घटना समोर आली आहे. पती प्रेमप्रकरणात इतका गुंतला की पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत फ्लॅटमध्ये राहू लागला. पत्नीला याची माहिती मिळताच ती फ्लॅटबाहेर धरणं धरून बसली. पत्नीने तिच्या ब्लॉक प्रमुख पतीला आग्रामध्ये राहणाऱ्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं. पत्नीला फ्लॅटबाहेर पाहून पतीची तारांबळ उडाली.
पत्नीला फ्लॅटबाहेर पाहताच पतीने स्वत:ला आपल्या प्रेयसीसोबत फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं. पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. यानंतर संतापलेली पत्नी फ्लॅटबाहेर धरणं धरून बसली. तिच्यासोबत तिची मुलगीही होती. लोकांनी हा गोंधळ पाहिला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं आणि खूप प्रयत्नानंतर पतीने घराचा दरवाजा उघडला. हे धक्कादायक प्रकरण ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे.यश यादव नावाच्या व्यक्तीचा शहरातील अन्सल अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे.

यश यादव हे मैनपुरीचे रहिवासी आहेत. यश हे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये ब्लॉक प्रमुख होते. त्यांचं लग्न नेहा नावाच्या महिलेशी मैनपुरीमध्येच झालं होतं. पत्नी नेहाने पती यश यादववर गंभीर आरोप केले आहेत. तिचं म्हणणं आहे, की तिच्या पतीने तिला मैनपुरीतील घरातून आग्रा इथे जात असल्याचं सांगितलं होतं. बिझनेससाठी आग्रा इथं जात असल्याचं त्याने सांगितलं, पण प्रत्यक्षात मात्र तो आग्रा येथील फ्लॅटमध्ये प्रेयसीसोबत राहत होता.यश यादवची पत्नी नेहा म्हणली, ‘आम्हाला मुलगीही आहे.
पती इथं प्रेयसीसोबत फ्लॅटवर राहत असल्याचं कळताच मी इथे आले. मी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडण्यास बराच वेळ सांगितलं, मात्र पतीने दरवाजा उघडला नाही. आपण अनेक तासांपासून फ्लॅटचा दरवाजा उघडण्यास सांगितलं, परंतु पती दरवाजा उघडत नव्हता. मी माझ्या मुलीला कुठे घेऊन जाऊ?’ या गोंधळाबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.