CCTV VIDEO:घरात स्वयंपाक करताना बॉम्बसारखा झाला कुकरचा स्फोट, सुदैवाने… पहा थरकाप उडवणारी घटनेच्या व्हिडिओ.

Spread the love

CCTV VIDEO: सध्या पंजाबमधील पटियाला येथील एका घरात घडलेल्या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किचनमध्ये स्वयंपाक करताना असे काही घडले आहे, जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. या व्हिडीओत, एक महिला गॅसवर कुकरमध्ये अन्न शिजवत असतानाच अचानक कुकरचा बॉम्बसारखा स्फोट झाला आहे. हा स्फोट किती भयंकर आहे याचा अंदाज व्हिडीओ पाहून लावला जाऊ शकतो.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. यावेळी तिथेच एक लहान एक मूल खेळत असल्याचंही दिसत आहे. शिवाय घरातील अन्य सदस्य इकडे-तिकडे करत असताना अचानक मोठा स्फोट होतो आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. सध्या या भयानक घटनेचा सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भयंकर घटनेचा व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर @Gagan4344 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

जो आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे या भयंकर स्फोटात घरातील कोणत्याही सदस्याला दुखापत झालेली नाही. परंतु, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जेवण बनवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो हे पाहायला मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

व्हायरल व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘खूप भयानक व्हिडिओ आहे’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘आता कुकरचीही भीती वाटायला लागली आहे.’ तिसऱ्या एकाने लिहिलं, ‘गीझरचा स्फोट, सिलेंडरचा स्फोट आणि आता कुकरचा स्फोट.. घरगुती उपकरण सुरक्षित आहेत का नाही?’

हे पण वाचा

टीम झुंजार